जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / sanjay raut : संजय राऊतांना दिलासा नाहीच, यंदा दिवाळी जेलमध्येच!

sanjay raut : संजय राऊतांना दिलासा नाहीच, यंदा दिवाळी जेलमध्येच!

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची दिवाळी ही जेलमध्येच जाणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 ऑक्टोबर : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची दिवाळी ही जेलमध्येच जाणार आहे.  न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे. त्यामुळे राऊत यांना यंदाची दिवाळी ही जेलमध्येच साजरी करावी लागणार  आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला. आज राऊत यांना पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर केले होते. राऊत यांचा जामीन अर्ज आणि नियमित सुनावणी एकाचवेळी सुरू झाली. ( ‘या आमच्या मध्यप्रदेशला’, पुण्यात मुख्यमंत्री शिवराजसिंह यांचं उद्योजकांना आवाहन ) ईडीकडून सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला.  संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरंगी अजून काही मुद्दे लेखी सादर केले आहे. मात्र हे प्रकरण अत्यंत कॉम्लिकेटेड असल्यानं मलाही याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे,  हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय निरीक्षण करत आहे.  या प्रकरणात मी आधीच स्पष्टीकरण दिले आहे. प्रवीण राऊत यांचा जामीन अर्जावर याआधीच निर्णय झाला आहे, असं म्हणत न्यायाधीशांनी राऊतांचा अर्ज फेटाळून लावला.  संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबरला सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे राऊत यांना जेलमध्येच मुक्कामी थांबावे लागणार आहे न्यायाधीशांचा निर्णय हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय निरीक्षण करत आहे. या प्रकरणात मी आधीच स्पष्टीकरण दिले आहे. प्रवीण राऊत यांचा जामीन अर्जावर याआधीच निर्णय झाला आहे, असं म्हणत न्यायाधीशांनी राऊतांचा अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, संजय राऊत हे कोर्टामध्ये माध्यमांसोबत बोलत असल्यामुळे पोलिसांनी न्यायाधीशांकडे तक्रार केली. यावर न्यायाधीशांनी पोलिसांचे चांगलेच कान उपटले, ‘तुम्हाला काय अडचण आहे, तुम्हीच म्हणता की हे राजकीय केस नाही, मग ते लोकप्रतिनिधी आहेत किंवा आरोपी आहे जे बोलतात. याबाबत ईडीला काहीच अडचण नाही, असं म्हणत न्यायाधीशांनी पोलिसांना झापलं.

News18लोकमत
News18लोकमत

यावर पोलीस म्हणाले की, सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. पोलिसांच्या या उत्तराने न्यायाधीश संतापले. ‘इथे काय गोळीबार होईल का? लेखी द्या, मग मी त्यावर निर्णय घेईल. मी बाहेर जाऊन सुरक्षा बघू शकत नाही. इतर आरोपींना चहा प्यायला नेतात, डबा खातात. जर ते राजकीय विधान करत असतील तर ईडीला काय अडचण आहे कारण ही राजकीय केस नाही, असे ईडीच म्हणत आहे. कोर्टाच्या बाहेरची गर्दी मी नियंत्रणात आणू शकत नाही. बाहेर लोक राऊत यांना भेटत असतील तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. जर कोणी बंदुक, चाकू आणला तर गोष्ट वेगळी आहे’ असं म्हणत न्यायाधीशांनी पोलिसांना खडेबोल सुनावले. . - ईडीच्या वतीने अटर्नी जनरल अनिल सिंह यांचा युक्तिवाद - म्हाडा जमीन गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला देण्यात आली - त्यात म्हाडाला इमारत बांधायची होती - मात्र फक्त 10 टक्के काम झालंय - म्हाडा कडून फ्लॅट विकण्याची परवानगी देण्यात आली - त्या पैशाचा वापर प्रोजेक्ट पूर्ण करण्या करता केला जाणार होता - ते पैसे इतर ठिकाणी डायव्हर्ट करायचे नव्हते - मात्र संबंधित प्लॉट 9 विकासकांना विकण्यात आले - ते पैसे गुरू आशिष कन्स्ट्रक्शन आणि HDIL यांना गेले - HDIL कडून प्रवीण राऊत यांना 112 कोटी रुपये आले - प्रवीण राऊत यांना 112 कोटी दिले गेले हे HDIL कडून कन्फर्म केलं गेलंय - त्याच बरोबर बँक स्टेटमेंट मधून ही कन्फर्म झालंय - अनिल सिंह यांनी संजय राऊत यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर प्रश्न केलायत्,जे त्यांनी ECI समोर सादर केलंय - पैशाचा स्रोत संशयास्पद आहे - 55 लाख कसे आले ? - या बाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही - गुन्हेगारीपासून आलेला पैसा जमा केला, त्याचा ताबा मिळवला, त्याचा वापर केला तर तो money laundering कायद्यानुसार दोषी ठरतो - 55 लाख 17 डिसेंबर 2010 प्रवीण राऊत यांनी आपली पत्नी माधुरीच्या खात्यात ट्रान्सफर केले. 23 डिसेंबर 2010 ला हीच रक्कम माधुरी यांच्या यंत्यातून वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा झाली - HDIL मधून ही रक्कम आली प्रवीण राऊत यांच्या खात्यात आली मग माधुरी यांच्या खात्यात आली मग संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात गेली - या पैशांतूनच संजय राऊत यांनी दादरच्या फ्लॅट खेरेदी केला - जरी हे कर्ज असे मान्य केले तरी हा पैसा गुन्हेगारीद्वारे संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात आला - गुन्हेगारीपासून आलेला पैसा जमा केला, त्याचा ताबा मिळवला, त्याचा वापर केला तर तो money laundering कायद्यानुसार दोषी ठरतोपैसे घेतले होते - प्रथमेश डेव्हलपर्स हे संजय राऊतच एकप्रकारे चालवत असल्याचे जबाब कांतीलाल आणि आणि अजून एका व्यक्तीने दिला आहे काय आहे प्रकरण? मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्राचाळ परिसरातील 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळमधील तीन हजार फ्लॅट बांधकाम करून 672 फ्लॅट भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. मात्र 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले. (CBI साठी महाराष्ट्राचे दार मोकळे, शिंदे सरकारचा मोठा निर्णय, मविआचा धक्का) या प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ईडीने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएलमधून 100 कोटी वळवण्यात आल्याचं समोर आलं. 2010 मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील 55 लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. वर्षा राऊत या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत. वर्षा यांनी ही रक्कम दादरमधील फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात