जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / तुळजाभवानीच्या दारातून 18 मुलांची सुटका, भिक मागताना आले आढळून!

तुळजाभवानीच्या दारातून 18 मुलांची सुटका, भिक मागताना आले आढळून!


बाल संरक्षण समितीने नवरात्र च्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे.

बाल संरक्षण समितीने नवरात्र च्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे.

बाल संरक्षण समितीने नवरात्र च्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे.

  • -MIN READ Osmanabad,Osmanabad,Maharashtra
  • Last Updated :

उस्मानाबाद, 24 सप्टेंबर : उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिर परिसरात आणि शहरात भिक मागणाऱ्या बाल भिक्षेकरी 18 मुलांना रेस्क्यू करण्यात आले आहे. यामध्ये 15 मुले आणितीन मुलींचा समावेश आहे. या सर्व मुलांना बाल सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरात बाल संरक्षण समितीने धडक कारवाई केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर मुलांना बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे. आई-वडिलांची ओळख पटेपर्यंत मुलांना बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. बाल संरक्षण समितीने नवरात्र च्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणाऱ्या बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी बाल संरक्षण समितीने शुक्रवारी हे रेस्क्यू ऑपरेशन केले. (Pune : I Love… सह अनेक फलकांवर पडणार हातोडा, आयुक्तांनी दिले आदेश ) रेस्क्यूमध्ये ताब्यात घेतलेल्या या बाल भिक्षुकांचे समुपदेशन करण्यात आले. शुक्रवारी दुपारी तुळजाभवानी मंदिर परिसरात हे ऑपरेशन राबविण्यात आले. तुळजाभवानी मंदिर परिसरात एकूण 18 अल्पवयीन मुले भिक मागताना प्रशासनाच्या पथकाला आढळून आली, त्यात 13 मुलं आणि 5 मुलीना ताब्यात घेतले आहे. सदरील मुलांना सांजा रोडच्या बालसुधारगृहात तर मुलींना नळदुर्गच्या आपलं घर मध्ये ठेवले आहे. तालुका शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन, नगर परिषद प्रशासन, तहसील प्रशासन, बाल संरक्षण समिती,चाईल्ड लाईन आदी विभागाचे 60 अधिकारी व कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी झाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात