• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • ही कितवी बायको आहे? एका प्रश्नानं उलगडलं दुसऱ्या हत्येचं रहस्य; सराफा खून प्रकरणाला वेगळं वळण

ही कितवी बायको आहे? एका प्रश्नानं उलगडलं दुसऱ्या हत्येचं रहस्य; सराफा खून प्रकरणाला वेगळं वळण

Murder in Beed: काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील शिरूर याठिकाणी विशाल कुलथे नावाच्या एका सराफा व्यावसायिकाची निर्घृण हत्या (Gold trader murder case) करण्यात आली होती. या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं असून आणखी एका हत्येची घटना उघड झाली आहे.

  • Share this:
    शिरूर, 02 जून: काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील शिरूर याठिकाणी विशाल कुलथे नावाच्या एका सराफा व्यावसायिकाची निर्घृण हत्या (Gold trader murder case) करण्यात आली होती. आरोपींनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफाला आपल्या सलूनमध्ये बोलावून त्याच्या मानेत कात्री खूपसून हत्या केली होती. पूर्व नियोजित पद्धतीने  हत्या केल्यानंतर आरोपींनी सराफा व्यावसायिक विशाल कुलथे यांचा मृतदेह आपल्याच शेतात नेऊन पुरला होता. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांनी विचारलेल्या एका प्रश्नामुळे आणखी एका हत्येचं गूढ उलगडलं आहे. सराफा व्यावसायिक विशाल कुलथे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर ऊर्फ भैय्या गायकवाड याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी पहाटे नाशिकमधून अटक केली आहे. दरम्यान पोलीस चौकशी सुरू असताना, आरोपी भैय्या गायकवाड याने दोन महिन्यांपूर्वी मित्रांच्या मदतीने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या एका प्रश्नामुळे आरोपी भैय्या गायकवाडचा भांडाफोड झाला आहे. पोलीस चौकशीत 'ही कितवी बायको आहे? असा प्रश्न विचारला असता गोंधळून गेलेल्या आरोपीने दोन महिन्यांपूर्वी केलेल्या दुसऱ्या एका हत्येची माहिती दिली आहे. हे ही वाचा-एक्सप्रेसमध्ये मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आरडाओरड करताच ट्रेनमधून फेकलं मुळचा शेगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील रहिवासी असणाऱ्या ज्ञानेश्वर गायकवाड बीड जिल्ह्यातील शिरूर याठिकाणी आपल्या मामाकडे वास्तव्याला होता. तो आपल्या गावात मुलींची छेड काढत असल्याने त्याला एकदा चोप मिळाला होता. त्यामुळे घरच्यांनी त्याची रवानगी मामाकडे शिरूर याठिकाणी केली होती. दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपी ज्ञानेश्वरची ओळख शीतल भामरे नावाच्या एका विवाहित महिलेशी झाली. तिला दोन मुलं असूनही आरोपीच्या प्रेमाखातर ती आरोपीसोबत राहायला शिरूर याठिकाणी आली. याठिकाणी दोघंही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहात होते. हे ही वाचा-VIDEO: प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या, 6 वर्षाच्या मुलीनं केला घटनेचा खुलासा पण काही दिवसांतच आरोपी ज्ञानेश्वर चारित्र्याच्या संशयातून विवाहित प्रेयसीला त्रास देऊ लागला. यातून दोघांत खटके उडू लागले. त्यामुळे आरोपीच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने मला परत नाशिकला नेऊन सोड असं सांगितलं. यावेळी आरोपीने 15 मार्च रोजी राहुरी याठिकाणी मित्र केतन लोमटे याच्यासोबत मिळून प्रेयसी शीतलचा डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. प्रेयसीचा खून केल्यानंतर त्याने आणखी एका मुलीशी विवाह केला होता. पण विवाहनंतर महिन्याभरातच त्याने सराफाचा खून केला. या घटनेचा तपास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published: