• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • धक्कादायक! साताऱ्यात एक्सप्रेसमध्ये 8 वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आरडाओरड करताच ट्रेनमधून फेकलं

धक्कादायक! साताऱ्यात एक्सप्रेसमध्ये 8 वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आरडाओरड करताच ट्रेनमधून फेकलं

धावत्या एक्सप्रेसमधून एका अल्पवयीन मुलीला बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:
सातारा, 1 जून: वास्को निजामुद्दीन एक्सप्रेस (Goa Nizamuddin Express) मधून 8 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चालत्या रेल्वेमधून बाहेर फेकण्याचा धक्कादायक प्रकार (8 year old girl thrown from train) घडल्याचे समोर आले आहे. अतिप्रसंग करताना आरडाओरडा केला म्हणून एका नराधमाने रेल्वेतून बाहेर फेकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साताऱ्यातील (Satara) लोणंद (Lonand) ते वाठार स्टेशनच्या (Wathar railway station) दरम्यान रात्री 1 वाजता ही घटना घडली आहे. सकाळी जखमी अवस्थेत सापडलेल्या या मुलीला लोणंद येथील ग्रामस्थांनी उपचारासाठी लोनंदच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. लोणंद पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांनी या मुलीचा पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी अवस्थेत सापडलेल्या या मुलीचा लोहमार्ग पोलिसांनी जबाब घेतला असून या मुलीने आपल्या जबाबात ही घडलेली घटना सांगितली आहे.रेल्वे मध्ये अशा प्रकारे घटना घडल्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी वेगाने तपास करत हे दुष्कृत्य करणाऱ्या आरोपीला भुसावळमध्ये अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा निझामुद्दीन एक्सप्रेस साताऱ्यात साधरणत: दीड वाजता येते. या गाडीत काल रात्री एक कुटुंब प्रवास करत होतं. आपल्या तीन मुलींसह दाम्पत्य दिल्लीला जात होते. रात्री जेवण झाल्यावर झोपले असताना आरोपीने 8 वर्षीय मुलीला बाथरूममध्ये नेलं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीला जाग आली आणि तिने आरडाओरड सुरू केला. यावेळी आरोपीने तिला सांगितलं की, ओरडू नको तुला आई-वडिलांकडे नेतो. असं म्हणत बाथरूममधून बाहेर आणल आणि ट्रेनमधून बाहेर फेकलं. त्याच्या मोबाईल चोरीमुळे 3 महिन्याचे बाळ झाले पोरके, मुंबईतील मन हेलावून टाकणारी घटना घाटरस्ता असल्याने ट्रेनचा स्पीड कमी होता. यामुळे पीडित मुलीला किरकोळ दुखापत झाली. सकाळच्या सुमारास स्थानिकांनी या मुलीला पाहिलं आणि तिला उपचारासाठी दाखल करण्यात आलं. रुग्णालयात या पीडित मुलीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर आम्ही तात्काळ तपास सुरू केला. राज्य लोहमार्ग पोलिसांनी संपूर्ण ट्रेनमधील प्रत्येक डब्यात पोलीस टीम पाठवल्या यानंतर पीडित मुलीने दिलेल्या वर्णनानुसार चार जणांपैकी एक आरोपी असल्याचं लक्षात आलं. व्हॉट्सअॅपवरुन हा फोटो रुग्णालयातील पोलिसांना पाठवला त्यानंतर या पीडित मुलीने त्याला ओळखलं आणि 10 तासांत आरोपीला अटक केली. पीडित मुलीच्या चेहऱ्यावर मार लागला असून पायाला फ्रॅक्टर झाले आहे आणि हाताला सुद्धा लागले आहे. आरोपी हा सैन्यात कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Published by:Sunil Desale
First published: