मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /BREAKING : विदर्भात Omicron ची एंट्री, नागपूरमध्ये पहिला रुग्ण आढळला

BREAKING : विदर्भात Omicron ची एंट्री, नागपूरमध्ये पहिला रुग्ण आढळला

नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण आफ्रिकेतून प्रवास करून नागपूरमध्ये परतला होता.

नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण आफ्रिकेतून प्रवास करून नागपूरमध्ये परतला होता.

नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण आफ्रिकेतून प्रवास करून नागपूरमध्ये परतला होता.

नागपूर, 12 डिसेंबर : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट  (Coronavirus Omicron Variant) ओमायक्रॉन हळूहळू राज्यभरात पसरत चालला आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ ओमायक्रॉनने नागपूर (nagpur) गाठले आहे. नागपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या परदेशी व्यक्तीचा रिपोर्ट ओमायक्रॉन पॉझिटिव्ह (Omicron positive) आला आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तीचे रिपोर्ट सुदैवाने निगेटिव्ह आले आहे.

नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण आफ्रिकेतून प्रवास करून नागपूरमध्ये परतला होता. तेव्हा या व्यक्तीचा कोविड चाचणी केली असता रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आढळला होता.. त्यानंतर जीनोमसिक्वेन्सीसाठी रुग्णाचा अहवाल पाठवण्यात आला होता. आज त्या रुग्णाचा ओमायक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती पालिका आयुक्त बी राधाकृष्णन यांनी दिली.

या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर एम्स हॉस्पिटलमध्ये  उपचार सुरू आहे.  या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांची कोविड चाचणी घेण्यात आली होती. मात्र सर्वांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहे.

प्रत्येक रात्रीसाठी गर्लफ्रेंडला एवढी रक्कम देतो हा तरुण; कारण वाचून व्हाल थक्क

दरम्यान, महाराष्ट्रात रुग्णांची संख्या आता 18 वर पोहोचवली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यात 7 नवीन रुग्ण आढळले होते. मुंबईमध्ये ३ रुग्ण आढळले तर पिंपरी चिंचवडमध्ये 4 रुग्णांची संख्या वाढली. मुंबईतील तिन्ही रुग्ण हे परदेशातून आलेले होते. या 7 रुग्णांपैकी चार जणांनी कोरोनाची लस घेतलेली होती. तर एका व्यक्तीने एकच कोरोनाचा डोस घेतला होता. धक्कादायक म्हणजे, या सात जणांमध्ये एका 3.5 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. या सातही जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.

नगरमध्ये परदेशातून आले 86 प्रवासी

तर अहमदनगर ( ahmednagar) जिल्ह्याची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत एकूण 156 आंतरराष्ट्रीय प्रवासी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामध्ये तब्बल 86 प्रवासी ओमायक्रॉनचा उगम झालेल्या देशातून आले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे.

अभिनेत्रीला बेडरूम VIDEO शेअर करणं पडलं महागात, आता होतेय ट्रोल

शुक्रवारी आणखी 24 प्रवाासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून नगर जिल्ह्यात दाखल झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 156 आंतरराष्ट्रीय प्रवासी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यातील 130 जणांचा शोध घेण्यात आला आहे. पण उर्वरित 26 जणांचा उद्याप शोध सुरू आहे. ओमिक्रॉन संसर्गाच्या तोंडावर आंतरराष्ट्रीय प्रवासी गायब झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढताना दिसत आहे.

First published:
top videos