नवी दिल्ली 12 डिसेंबर : जगात अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत. हे विचार त्यांच्या पुरतेच मर्यादित राहिले तर चांगलंच आहे. मात्र ते जर सोशल मीडियावर व्हायरल झाले तर नेटकरीही हैराण होतात. एका महिलेनं आपल्या पार्टनरसोबत असलेल्या नात्याबद्दलही (Girlfriend-Boyfriend Relationship) असाच खुलासा केला आहे. तिचा पार्टनर तिच्यासोबत रात्रभर थांबल्यावर प्रत्येक वेळी तिला एक ठरलेली रक्कम देतो (Man Gives Money to Her Girlfriend after Every Night).
नवरदेवाची मस्ती नवरीला पडली महागात; मंडपातच धाडकन तोंडावर आपटली अन्..., VIDEO
महिलेनं ही पोस्ट Reddit वर शेअर केली आहे. महिलेनं स्वतःची आणि आपली पार्टनरची ओळख गुपितच ठेवली आहे. तिने सांगितलं की ख्रिसमसचं गिफ्ट म्हणून त्यांनी वेगळीच डील केली आहे. जर त्यांचं नातं कमी रोमँटिक राहिलं तर यावेळी तिला ख्रिसमस गिफ्टही मिळणार नाही.
महिलेनं लोकांना आपल्या पार्टनरसोबत झालेली डील सांगत म्हटलं की तिचा पार्टनर जितक्या वेळा तिच्यासोबत रोमँटिक रिलेशनशिपमध्ये जातो, तेव्हा तिला 1500 रुपये देतो. यासाठी तिने आता एक बॉक्सच बनवला असून यात ती हे पैसे साठवते. अट अशी आहे की हे पैसे जितके जास्त असतील तितके जास्त गिफ्ट महिलेला मिळतील. महिलेने आपण साठवलेल्या पैशांचा फोटोही शेअर केला आहे. महिलेनं ही पोस्ट सहजच शेअर केली असली तरी लोकांनी मात्र हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे.
सर्जरी करून लावला दुसऱ्याचा प्रायव्हेट पार्ट; सांगितलं कसं आहे वैवाहिक जीवन
महिलेची ही पोस्ट वाचून कोणीही याचं कौतुक केलेलं नाही. लोकांना यावर प्रतिक्रिया देत हे अतिशय वाईट असल्याचं म्हटलं आहे. एका यूजरनं लिहिलं, की हा व्यक्ती आपल्या पार्टनरला प्रॉस्टिट्यूट बनवत आहे. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, की हा अतिशय वाईट विचार आहे. बहुतेक महिलांनाही या तरुणीच्या पार्टनरबद्दल वाईट मतं मांडली आहेत. मात्र, या तरुणीला याबाबत काहीही तक्रार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Boyfriend, Girlfriend, Relationship