मुंबई, 12 डिसेंबर : 'द कपिल शर्मा शो'मध्ये तुम्ही अभिनेत्री रोशेल रावलला (Rochelle Rao) कधी 'नर्स' तर कधी 'चिंगारी'च्या अवतारात पाहिलं असेल. रोशेल राव सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचा पती आणि अभिनेता किथ सिक्वेरासोबत (Keith Sequeira) ती अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंसह व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच तिने पती कीथ सिक्वेरासोबत तिच्या बेडरूममधील असा एक व्हिडिओ (Rochelle Rao and keith sequeira Private Video) शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक तिला सल्ला देत आहेत तर काहीजण तिचा व्हिडिओ पाहून प्रेम व्यक्त करत आहेत.
रोशेल रावने शेअर केला पतीसोबतचा बेडरूम व्हिडिओ
रोशेल रावने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रोशेलसोबत पती कीथ सिक्वेरा दिसत आहे. हा त्यांच्या बेडरूममधील व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये 'चिंगारी' तिच्या खऱ्या पतीसोबत बेडवर पडलेली दिसत आहे. कीथ त्याच्या फोनवर काहीतरी पाहत असताना, रोशेल खाली पडून लॅपटॉपवर काही काम करत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला सर्व काही सामान्य आहे परंतु शेवटी मात्र काही तरी चित्र वेगळे पाहायला मिळते.
वाचा : कतरिना-विकीने मेंदी सोहळ्यात केली फुलटू धमाल, फोटोत दिसलं फक्त प्रेम..
कीथ फोन बाजूला ठेवतो आणि रोशलला किस करतो. यानंतर रोशेल तिचा लॅपटॉपही बंद करते. रोशेलला किस केल्यानंतर तो पोटावर झोपतो. पोटावर झोपताच त्याच्या पाठीवर काहीतरी लिहिलेले दिसते. कीथच्या पाठीवर लिहिले आहे – ‘या वेळेचा वापर करा…’ रोशेलनेही तिच्या कपाळावर हात ठेवला, ज्यामध्ये लिहिले आहे – कनेक्ट. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
वाचा : Ankita Lokhande च्या हातावर सजली विकीच्या नावाची मेहंदी; VIDEO व्हायरल
व्हिडिओमध्ये कीथ शर्टलेस आहे, तर रोशेल गुलाबी नाइट वेअरमध्ये दिसत आहे. या व्हिडिओद्वारे दोघेही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की केवळ फोन आणि लॅपटॉपमध्ये मग्न राहून कोणतेही जोडपे निरोगी नातेसंबंध जोपासू शकत नाही. रोशेल रावचा हा व्हिडिओ काही जणांना आवडला आहे, तर काहीजण तिला ट्रोल करत आहेत. काहीजण तिला सभ्यपणाचा धडा शिकवत आहेत.
View this post on Instagram
एका यूजरने लिहिले आहे की, हे लव्ह फॉर्म होम आहे. तर दुसर्याने लिहिले आहे की, सुंदर जोडपे. तसेच काही लोक आहेत जे सोशल मीडियावर अशाप्रकारचे व्हिडिओ शेअर करू नका असं सांगत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv actress, TV serials