मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ऑलिम्पिकपटू प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांचा घरासाठी सुरू असणारा वाद अखेर मिटला, वाचा काय आहे प्रकरण

ऑलिम्पिकपटू प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांचा घरासाठी सुरू असणारा वाद अखेर मिटला, वाचा काय आहे प्रकरण

प्रवीण जाधव यांच्या कुटुंबीयांना घर बांधण्यासाठी जो काही त्रास दिला जात आहे, त्याबाबत सातारा पोलीस विभाग आणि महसूल विभागामार्फत मध्यस्थी करण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहराज्मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे

प्रवीण जाधव यांच्या कुटुंबीयांना घर बांधण्यासाठी जो काही त्रास दिला जात आहे, त्याबाबत सातारा पोलीस विभाग आणि महसूल विभागामार्फत मध्यस्थी करण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहराज्मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे

प्रवीण जाधव यांच्या कुटुंबीयांना घर बांधण्यासाठी जो काही त्रास दिला जात आहे, त्याबाबत सातारा पोलीस विभाग आणि महसूल विभागामार्फत मध्यस्थी करण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहराज्मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे

सातारा, 04 ऑगस्ट: एखाद्या ठिकाणी घर बांधताना किंवा नवीन खरेदी करताना काही वेळा वादांना सामोरं जावं लागतं. शेजाऱ्यांशी होणारे वाद तर अनेकांसाठी नेहमीचे आहेत. या वादापासून टोकयो ऑलिम्पिकपटू प्रवीण जाधव देखील सुटला नाही आहे. टोकयो ऑलिंपिकमध्ये 'आर्चरी’ (तिरंदाजी) क्रिडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रवीण जाधवला घर बांधकामावरुन शेजाऱ्यांच्या कलहाला तोंड द्यावे लागलं आहे. चार गुंठे जागेवरुन सुरु झालेला वाद प्रशासनापर्यंत पोहचला आहे. 'प्रांताधिकाऱ्यांनी घर बांधायला जागा दिली असताना त्यात समाधानाने राहाता येत नसेल तर या गावात राहून तरी काय करायचे.' असा पवित्रा प्रवीणच्या कुटुंबाने घेतला होती. सध्या हा वाद मिटल्याची माहिती राज्याचे गृहराज्मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

प्रवीण जाधव यांच्या कुटुंबीयांना घर बांधण्यासाठी जो काही त्रास दिला जात आहे, त्याबाबत सातारा पोलीस विभाग आणि महसूल विभागामार्फत मध्यस्थी करण्यात आली असल्याचं देसाई म्हणाले. दोन्ही कुटुंबातील वाद मिटला असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे वाचा-Tokyo Olympics : दीपक पूनियाचे गोल्ड मेडल हुकले, सेमी फायनलमध्ये पराभूत

फलटणपासून साधारण 16 किलोमीट टरअंतरावर असलेले सरडे हे प्रवीणचं गाव. याठिकाणी तो वाढला, शिकला, मोठा झाला. प्रवीणचे वडील आजही सरडे गावात मजुरी करतात. जागतिक ऑलंपिक स्पर्धेमधील तिरंदाजी या क्रीडा प्रकारासाठी भारतीय संघात सरडे गावच्या प्रवीण जाधव याची निवड झाली होती. घरी आई-वडील, चुलती व चुलतभाऊ असे चार जणांचे कुटुंब दोन खोल्यांमध्ये रहाते. स्वत:चे घर नसल्याने शेती महामंडळाने त्यांना 84 गुंठे शिल्लक जागेपैकी काही गुंठे क्षेत्र घर बांधण्यासाठी दिले आहे. त्याठिकाणी बांधकाम करायला शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाचा विरोध होता. या विरोधातून दोन दिवसापूर्वी दोन्ही कुटु्ंबात वाद झाल्याची माहिती समोर आली होती.

" isDesktop="true" id="587916" >

यावेळी प्रवीणचे वडील रमेश जाधव यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, 'फलटणच्या प्रांताधिकाऱ्यांनी आम्हांला घर बांधणीसाठी जागा मोजून दिली आहे. शेती महामंडळाच्या 84 गुंठे शिल्लक क्षेत्रातील जागा आम्हांला मोजून देण्यात आली आहे. तरी शेजारचे एक कुटुंब शेती महामंडळाने दिलेली जागा आमचीच आहे, असं सांगून बांधकामात अडथळा आणत आहेत.' प्रवीण जाधवच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाने दोन खोल्याचे घर जेसीबीने पाडू अशी धमकी त्यांना दिली असल्याचा आरोप प्रवीणच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे गावातून सहकार्य होणार नसेल तर आम्हीं दुसऱ्या गावात घरबांधून राहू असे रमेश जाधव यांनी सांगितले आहे.

हे वाचा-IND vs ENG : इंग्लंडने टॉस जिंकला, 'ही' आहे टीम इंडियाची Playing 11

प्रवीण जाधवसारख्या ऑलिम्पिक खेळलेल्या खेळाडूंच्या कुटुंबावर अन्याय होत असेल आणि त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करणार असेल तर ही निंदनीय बाब आहे.  याप्रश्नी तोडगा न निघाल्यास सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा सरडे गावचे माजी सरपंच  रामभाऊ शेंडगे यांनी दिला आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, प्रांतधिकारी शिवाजी जगताप आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन हा वाद मिटवला आहे. ही जागा शेती महामंडळा दिलेली जागा आखून दिलेली आहे, शिवाय अशी कोणतीही तक्रार फलटण पोलीस ठाण्यात दाखल केलेली नसल्याने संबंधित व्यक्तीने माघार घेतली आहे. मात्र प्रवीणच्या कुटुंबीयांना शाब्दिक वादाला  सामोरं जावं लागलं होतं.

First published:

Tags: Satara