टोकयो, 4 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताच्या रवी कुमार दहियानं (Ravi Kumar Dahiya) 57 किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये फायनलमध्ये धडक मारली. त्यानंतर दीपक पूनिया (Deepak Punia) ची लढत अमेरिकेच्या डेव्हीड टेलरशी होती. या सामन्यात विजय मिळवून गोल्ड मेडलसाठी फायनलमध्ये खेळण्याचं दीपकचं स्वप्न भंगलं आहे.
डेव्हीड टेलरनं दीपक पूनियाचा अगदी सहज पराभव केला. डेव्हिडनं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत दीपकला कोणतीही संधी दिली नाही. दीपकला या मोठ्या पराभवानंतरही ब्रॉन्झ मेडलची आशा कायम आहे. ब्रॉन्झ मेडलसाठी तो गुरुवारी खेळेल.
Deepak Punia lost his SF against American wrestler Taylor. Deepak will now contest for Bronze tomorrow ♂️#Tokyo2020 | #TeamIndia | #Wrestling
— The SportsGram India (@SportsgramIndia) August 4, 2021
दीपकनं यापूर्वी 6 मिनिटांचा वेळ संपण्याच्या 1 मिनिट आधीच टेक्निकल सुपरियारिटीनं क्वार्टर फायनलमध्ये विजय मिळवला होता. त्याने सुरुवातीच्या तीन मिनिटांत 4 - 1 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर पुढील तीन मिनिटं संपण्याच्या आधी दीपकनं 10 गुणांची आघाडी घेतली. 10 गुणांची आघाडी घेतल्यानंतर टेक्निकल सुपरियारिटीमुळं त्याला विजयी घोषित करण्यात आलं. दीपक पुनियानं नायजेरीया अगियोमोरचा पराभव केला होता.
रवी कुमारची फायनलमध्ये धडक
पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये भारताच्या रविकुमार दहीया (Ravi Kumar Dahiya) ची लढत कझाकस्तानच्या नूरइस्लाम सानायेवशी ( Nurislam Sanayev) होती. या मॅचमध्ये रवी कुमार विजयी झाला आहे. भारताकडून यापूर्वी सुशील कुमारनं ऑलिम्पिक फायनलमध्ये धडक मारली होती. त्याची बरोबरी रवी कुमारने केली आहे.
रवी कुमारनं मॅचच्या सुरुवातीला 2-1 अशी निसटती आघाडी घेतली होती. त्यानंतर सनायेवनं जोरदार खेळ करत रवीवर 9-2 ने आघाडी घेतली. त्यानंततर सनायाला फिटनेसची समस्या जाणवली. त्यामुळे रवीनं ही आघाडी 5-9 ने कमी केली. रवीनं त्यानंतर जोरदार खेळ करत 7-9 नं ही आघाडी कमी केली. रवी कुमारनं त्यानंतर ही आघाडी कायम ठेवत विजय मिळवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021