नॉटिंघम, 4 ऑगस्ट : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England Test Series) यांच्यातील पहिली टेस्ट मॅच नॉटिंघममध्ये सुरु झाली आहे. दोन देशांमध्ये सहा महिन्यांपूर्वी झालेली टेस्ट सीरिज भारताने 3-1 ने जिंकली होती. आता इंग्लंडमध्ये या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न यजमान टीम करणार आहे. तर टीम इंडियाला 14 वर्षांची प्रतीक्षा संपवण्याची चांगली संधी या सीरिजमध्ये आहे.
नॉटिंघम टेस्टमध्ये इंग्लंडचा कॅप्टन जो रूटनं टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final) खेळलेल्या टीममध्ये तीन बदल केले आहेत. यापैकी शुभमन गिल (Shubman Gill) दुखापतग्रस्त असल्यानं त्याच्या जागी केएल राहुलचा (KL Rahul) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. राहुलने सराव सामन्यामध्ये शतक करत आपण फॉर्ममध्ये असल्याचं दाखवून दिलं आहे.
रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) जागी शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ब्रिस्बेन टेस्टमध्ये शार्दुलने धमाकेदार अर्धशतक झळकावलं होतं, तसंच 7 विकेटही घेतल्या होत्या. भारताच्या ऐतिहासिक विजयात शार्दुलची भूमिका मोलाची ठरली होती. इंग्लंडच्या स्विंग होणाऱ्या खेळपट्टीवर शार्दुल बॉलिंगमध्येही उजवा ठरेल अशी टीम मॅनेजमेंटला आशा आहे. त्याचबरोबर अनुभवी इशांत शर्माच्या (Ishant Sharma) जागी ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या मोहम्मद सिराजचा (Mohammed Siraj) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
Tokyo Olympics : भारताचे आणखी एक मेडल नक्की, रवी कुमारची फायनलमध्ये धडक
टीम इंडियाची Playing 11
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england