मुंबई, 06 जुलै: ओबीसी आरक्षणावरून (OBC reservation) राज्यात भाजप (BJP) आणि राज्य सरकारमध्ये वाद शिगेला पोहोचला आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) कोरोना काळ पाहता निवडणुका घेण्याबद्दलचा अधिकार निवडणूक आयोगावर सोपवला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग राज्यातील 5 जिल्हा परिषदेच्या निवडणूक (Zilla Parishad election) पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था च्या ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. ए.एम.खानविलकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. राज्य ग्रामविकास खात्याकडून याचिका दाखल करण्यात आली होती.
मोठी बातमी! DA बाबत या आठवड्यात मोदी सरकार घेणार अंतिम निर्णय
यावेळी कोरोनाचा काळ पाहता निवडणूक घ्यायची की नाही हे राज्य निवडणूक आयोगाने ठरवावे. कोविड परिस्थिती पाहता निवडणूक सध्या घ्यायच्या की नाही हे राज्य निवडणूक आयोग ठरवेल, तसा निर्णय त्यांनी कोर्टाला कळवावा, असं न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं.
सिगरेट पेटवण्यासाठी माचीस न दिल्यानं तरुणाला मारहाण; कत्तीनं जीवघेणा हल्ला
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यामुळे राज्यात जाहीर झालेल्या 5 जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलण्यात येण्याची दाट शक्यता आहे. ओबीसी आरक्षण अधिक झाल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. पण निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे ओबीसी संघटना आणि ओबीसी नेत्यांनी विरोध केला होता. निवडणूक न घेण्याबाबत राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाला पत्र व्यवहारही करण्यात आला होता. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
29 जून 2021 ते 5 जुलै 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील. 4 जुलै 2021 रोजी रविवार असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 6 जुलै 2021 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे 9 जुलै 2021 पर्यंत अपील दाखल करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 12 जुलै 2021; तर अपील असलेल्या ठिकाणी 14 जुलै 2021 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 19 जुलै 2021 रोजी सकाळी 07.30 ते सायंकाळी 05.30 या वेळेत मतदान होईल. 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होईल.
जिल्हानिहाय जागा
जिल्हा जि.प.विभाग
धुळे- 15
नंदुरबार- 11
अकोला- 14
वाशीम- 14
नागपूर- 16
पं. स. निर्वाचक गण
धुळे- 30
नंदुरबार- 14
अकोला- 28
वाशीम- 27
नागपूर- 31
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, High Court, Maharashtra, Suprim court