नवी दिल्ली / औरंगाबाद, 7 जून : काही दिवसांपूर्वी केरळमधील एका गर्भवती हत्तीणीबरोबर झालेल्या मानवी क्रौर्यास काही दिवस उलटले आहेत. त्यातच आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
त्या हत्तीणीसोबत झालेल्या क्रौर्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. असे असूनही, देशात जनावरांवर क्रूरतेचे प्रमाण कमी झालेले नाही. प्राण्यांसोबत क्रूरतेचा आणखी एक व्हिडीओ महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातून आला आहे.
या व्हिडीओमध्ये दोन माणसे मोटरसायकलच्या मागे कुत्रा खेचत आहे. या मोटारसायकलवरुन ते कुत्र्याला खेचत असल्याचे व्हिडीओत दिसत आहेत. कुत्र्यांवरील या क्रौर्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये मोटरसायकलच्या मागील बाजूस कुत्र्याला बांधलं असून ते त्याला खेचत आहे. तर दुसरी व्यक्ती मोटरसायकल चालवत होती. त्यावेळी पाठीमागून एक कार येत होती. मोटारीवर बसलेल्या व्यक्तीने कुत्र्यावर असलेल्या या क्रौर्याचा व्हिडीओ मोबाईलवर रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ पहा…
A guy dragging his dog on the road... Very cruel ... Bike no MH20**9436 ... Near Shivaji high school Aurangabad Maharashtra... Can anyone help us finding out this no. #animallovers #cruelact #carryminati #AnimalsLivesMatter #blacklifematters #safeanimals #CoronaUpdatesInIndia pic.twitter.com/8FtWivVqyC
— Rohit Sonawane (@Rohitks25) June 6, 2020
पोलिसांनी केली कारवाई
औरंगाबाद येथे कुत्र्यासोबत अत्यंत क्रुर वागणुकीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस प्रशासनाने या दोघांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.
केरळमध्ये हत्तीणीवर पाशवी अत्याचार
केरळमध्ये काही दिवसांपूर्वी एका गरोदर हत्तीणीला अननसातून फटाके खायला दिले होते. त्यानंतर फटाक्यांच्या स्फोटांमुळे हत्तीणी गंभीर जखमी झाली. आणि काही काळानंतर हत्तीणी नदीत उभी असताना मरण पावली.
हे वाचा-रुपेरी पडद्यावरील खलनायक ठरला हिरो, अभिनेता सोनू सूदवरून राजकारण पेटलं!
मुंबईतील रुग्णालयाचा मोठा निष्काळजीपणा उघड; 500 जणांचे जीव धोक्यात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Video