मुंबई, 21 जून : विधान परिषद निवडणूक (MLC Election Result) निकालानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. या निकालानंतर महाविकासआघाडीला (MAHAVIKAS AGHADI) मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे (eknath shinde shiv sena) 29 आमदार फुटलेले आहेत. शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक आमदार फुटलेले आहेत. शिंदे यांना खासदार सीआर पाटील (mp c r patil) यांनी सुरत येथे हॉटेलमध्ये जाण्यास मदत केल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.
ते म्हणाले की, आम्ही राज्यात घडणाऱ्या घटनांच्या वळणांचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. त्यामुळे काही बदल होतील असे म्हणणे थोडे घाईगडबडीचे आहे. आम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडून काहीही निरोप आला नाही. त्यांनी जर आमच्यासमोर प्रस्ताव ठेवला तर आम्ही यावर नक्कीच विचार करून असे पाटील म्हणाले. याचबरोबर ही अडीच वर्षे सोडली तर मागची कित्येक वर्षे शिवसेना आमच्या सोबत होती आम्हाला शिवसेनेतील आमदारांच्या भावना माहित आहेत.
हे ही वाचा : ‘कर्मवीर’ एकनाथ शिंदेंवर बंड पुकारण्याची वेळ का आली? काय आहे खरं कारण? संजय राऊतांचा काय आहे संबंध?
Problems have cropped up in their party only due to instigating statements of Sanjay Raut. People won't tolerate - Eknath Shinde's rebellion is an example. Sanjay Raut should speak politely. He doesn't need to speak harshly on every matter: Maharashtra BJP chief Chandrakant Patil https://t.co/wjqC7VMxxE pic.twitter.com/3oSp25JRAQ
— ANI (@ANI) June 21, 2022
It is our tradition that we need to go to our national leaders with sweets, after winning an election. Devendra Fadnavis has gone to distribute sweets among our party leaders in Delhi: Maharashtra BJP chief Chandrakant Patil when asked about Devendra Fadnavis' visit to Delhi pic.twitter.com/u93KoMTgRP
— ANI (@ANI) June 21, 2022
सध्या सुरु असलेल्या घडामोडींकडे आम्ही बारकाईने लक्ष देऊन आहोत आम्हाला सरकार स्थापन करण्यास मदत झाली तर आम्ही काही शांत बसणारे नाही आम्ही काही भजनी मंडळी नाही. सरकार स्थापनेसाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार पण अजून आमची सावध भूमिका आहे. याचबरोबर आम्ही सध्या ताकही फुंकून पीत आहोत.
संजय राऊत यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळेच त्यांच्या पक्षात अडचणी निर्माण झाल्या आहेत. जनता संजय राऊत यांना सहन करणार नाही. शिवसेनेतील आमदारांची नाराजी हे एकनाथ शिंदे यांचे बंडाचे मुख्य उदाहरण आहे. संजय राऊत यांनी नम्रपणे बोलावे. त्यांनी प्रत्येक बाबतीत कठोरपणे बोलण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.