Home /News /maharashtra /

Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; नंदुरबारमध्ये गुन्हा अदखलपात्र दाखल, लॅपटॉपही जप्त होणार

Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; नंदुरबारमध्ये गुन्हा अदखलपात्र दाखल, लॅपटॉपही जप्त होणार

अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale) हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यानंतर सर्वचस्तरावरुन प्रतिक्रिया येत आहे.

>> निलेश पवार, नंदुरबार प्रतिनिधी नंदुरबार, 16 मे : अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketki Chitale) हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर सर्वच स्तरावरुन तिच्यावर टीका होत आहे. याप्रकरणी, आता केतकी चितळेच्या विरोधात नंदुरबारमध्ये अदखलपात्र गुन्हा (Non Cognizable Offence) दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अॅड. नितीन भावे यांच्याविरोधातही भादवि 500, 501,505 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नितीन जगताप यांनी तक्रार अर्ज दिला होता. काय आहे प्रकरण?  अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही आपल्या सोशल मीडियातील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियातील पोस्टमुळे केतकी यापूर्वी अनेकदा ट्रोलही झाली आहे. त्याच दरम्यान आता पुन्हा एकदा केतकी चितळे तिने केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आली आहे. (Controversial Facebook Post of Actress Ketaki Chitale). केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टनंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. तिच्यावर आता नंदुरबारमध्ये अदखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. लॅपटॉप जप्त होण्याची शक्यता -  तर ठाणे पोलिसांची टीम केतकीला घेऊन तिच्या रोडपाली घरी दाखल झाली आहे. घरातील लॅपटॉप, आणखी काही वस्तू जप्त करण्याची शक्यता आहे. केतकीवर नेरूळ पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिच्या नवी मुंबईतील घरासमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दक्षता घेतली जात आहे. हेही वाचा - ''केतकी चितळेची पवारांविषयीची FB पोस्ट अतिशय...'', सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया
केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान, 14 मेला केतकीला अटक करण्यात आली होती. यानंतर तिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तिला अटक केली आहे. यानंतर ठाणे कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली. कोर्टात केतकीनं वकील घेतला नाही, तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेनं 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Maharashtra politics, Sharad Pawar (Politician)

पुढील बातम्या