Home /News /maharashtra /

''केतकी चितळेची पवारांविषयीची FB पोस्ट अतिशय...'', सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

''केतकी चितळेची पवारांविषयीची FB पोस्ट अतिशय...'', सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar)यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर सर्वचजण अभिनेत्री केतकी चितळेवर (Ketki Chitale) टीका (criticizing) करत आहे.

    ठाणे, 16 मे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar)यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर सर्वचजण अभिनेत्री केतकी चितळेवर (Ketki Chitale) टीका (criticizing) करत आहे. आता या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी आपलं मत नोंदवलं आहे. अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) नं केलेलं ट्वीट अतिशय घाणेरडं आणि चुकीचं होतं, अशी प्रतिक्रिया सुजात आंबेडकर यांनी दिली आहे. माध्यमांनी सध्या प्रश्न आणि उत्तर सभा सोडून महाराष्ट्रात टँकर विक्री किती वाढली आहे? यावर रिपोर्ट करावा, असा सल्ला देत त्यांनी टोला लगावला आहे. कल्याणमध्ये मूकनायक ते प्रबुद्ध भारत कार्यक्रमासाठी काल (रविवारी) सुजात आंबेडकर आले होते. सकाळी 7.12 वाजता केलेलं संजय राऊत यांचं 'ते' Tweet चर्चेत शरद पवार यांना महाराष्ट्रात आदराचं स्थान आहे. जगभरातील कॅन्सरच्या रुग्णांसाठी शरद पवार हे एक प्रेरणा आहेत. कॅन्सरवर मात करून ते या वयातही इतकं बोलतात, लोकांना भेटतात, भाषणं करतात. अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाची भाषा वापरणे अयोग्य असल्याचे सुजात आंबेडकर यांनी म्हटलं. पुढे सुजात आंबेडकर म्हणाले की, अशाप्रकारच्या ट्रोलिंगमुळे नेत्यांचं मानसिक आरोग्य बिघडू शकते. केतकी चितळेचे वक्तव्य अतिश्य घाणेरडं आणि चुकीचं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करायचा असेल तर धोरणांवर, भूमिकांवर आणि राजकारणावर टीका करा. पण कुणाच्या अंगावर, दिसण्यावर नाही. केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी केतकीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तिला अटक केली आहे. यानंतर आज ठाणे कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली. कोर्टात केतकीनं वकील घेतला नाही, तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. सकाळी केतकीला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेनं 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली. केतकीची पोस्ट नेमकी काय आहे ? अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीने 'तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Sharad Pawar (Politician)

    पुढील बातम्या