Home /News /maharashtra /

निसर्ग चक्रीवादळाने संसार उद्धवस्त केले, पोलिसांनी सावरले

निसर्ग चक्रीवादळाने संसार उद्धवस्त केले, पोलिसांनी सावरले

वाऱ्याच्या अतितीव्र तडाख्याने लोकांच्या घरांवर, ठिकठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या झाडांमुळे दळणवळण पूर्णपणे ठप्प आहे.

श्रीवर्धन, 07 जून : श्रीवर्धनमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत होण्यासाठी अखेर दिघी सागरी पोलीस प्रशासनानेच मदतीसाठी अहोरात्र मेहनत करत इतर प्रशासनांची जबाबदारी देखील स्वतःच्या खांद्यावर घेतली. स्वतः दिवसरात्र रस्त्यावर उतरून रस्त्यावरील, लोकांच्या घरांवरील, मंदिरांवरील झाडे बाजूला करणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. एकीकडे जगभर कोरोनाने थैमान घातलेले असताना पोलीस प्रशासन योद्धा बनून आपले चोख कर्तव्य बजावत आहे तर दुसरीकडे रायगडमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या संकटाने देखील जनजीवन विस्कळीत केले आहे. हेही वाचा- मेष आणि धनु राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण न ठेवल्यास होऊ शकतं नुकसान वाऱ्याच्या अतितीव्र तडाख्याने लोकांच्या घरांवर, ठिकठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या झाडांमुळे दळणवळण पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे एकूणच पोलीस प्रशासन जनजीवन सुरळीत करण्यासाठी तारेवरची कसरत करत आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिलेल्या सूचनेनुसार, 'रायगड जिल्ह्यातील आपत्तीमुळे जनजीवन सुरळीत करण्यासाठी ज्या भागात इतर तालुका प्रशासन पोहोचू शकले नाही त्याठिकाणी स्वतः जातीने पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन युद्धपातळीवर काम करावे आणि एक वर्दीतला सच्चा माणूस या नात्याने जनतेची सेवा करावी.' हेही वाचा-मुंबईत गॅस गळतीच्या तक्रारी, अग्निशमन दलाच्या 17 गाड्या घटनास्थळी त्या अनुषंगाने श्रीवर्धन तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे इतर तालुका प्रशासन वेळेवर सर्वच ठिकाणी पोहोचू शकले नाही यासाठी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मचारी स्थानिकांच्या मदतीने रस्त्यांवर उतरून झाडे तोडुन बाजूला करत आहेत; एवढंच नाही तर लोकांच्या घरांवर, गावांतील मंदिरांवर पडलेली झाडे सुद्धा बाजूला करण्याचे काम पोलीस प्रशासन करत असल्याने सर्वत्र पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.  संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Raigad police

पुढील बातम्या