Home /News /mumbai /

मुंबईत गॅस गळतीच्या तक्रारी, अग्निशमन दलाच्या 17 गाड्या घटनास्थळी

मुंबईत गॅस गळतीच्या तक्रारी, अग्निशमन दलाच्या 17 गाड्या घटनास्थळी

मुंबई महापालिकेनं नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे.

    मुंबई, 07 जून : गोवंडी, भांडूप, पवई, विक्रोळी, घाटकोपर या भागातून रात्री गॅस गळतीच्या तक्रारी आल्याची माहिती महानगरपालिकेच्या आपात्कालीन विभागानं दिली. या तक्रारींच्या आधारे अग्निशमन दलाकडून 17 गााड्या घटनास्थळी दाखल झाल्या. महापालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाकडून तपासणी केल्यानंतर या कोणत्याही भागात गॅस गळती होत नसल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाकडून अद्यापही तपासणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिकेनं नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे. परिस्थिती नियंत्रणात असून गॅस गळतीचे कारण आणि स्त्रोत याचा शोध सुरू असल्याचंही सांगण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या 17 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आजूबाजूच्या भागांमध्ये तपासणी सुरू आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, महानगर गॅस लिमिटेड, राष्ट्रीय रसायन व खत्याच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशीच्या सूचना देण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. नागरिकांनी दारं, खिडक्या बंद ठेवाव्यात आणि कुणाला दुर्गंधीमुळे अति त्रास होऊ लागला तर नाकावर ओला कपडा ठेवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. गॅस पॅलपाईनचीही तपासणी केली महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, रात्री दहाच्या सुमारास मुंबईतील अनेक भागातून गॅस गळती झाल्याच्या तक्रारी आल्या. आपत्कालीन टीम त्या भागात पोहोचली आहे. आम्ही पाईपलाईन यंत्रणा तपासत आहोत आणि आतापर्यंत नुकसान किंवा गळतीची होत असल्याचं तपासणीदरम्यान आढळलं नाही. संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Aaditya thackeray, BMC

    पुढील बातम्या