Home /News /lifestyle /

राशीभविष्य : मेष आणि धनु राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण न ठेवल्यास होऊ शकतं नुकसान

राशीभविष्य : मेष आणि धनु राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण न ठेवल्यास होऊ शकतं नुकसान

कोणाचे स्टार्स चमकणार कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

    मुंबई, 07 जून : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम दिवसावर होत असतो. येणाऱ्या दिवसातील समस्यांची पूर्वकल्पना असेल तर त्यांचा सामना करण अधिक सोपं जातं. यासाठी जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस मेष - भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येतील. आपण बर्‍याच काळासाठी गुंतवणूक केली तर महत्त्वपूर्ण फायदा होऊ शकेल. वृषभ- स्वार्थी व्यक्तीच्या सहवासामुळे आपलं नुकसान होऊ शकतं.अडचणींना सामोरे जात आहात. प्रलंबित कामं आजच्या आजचं पूर्ण करा. मिथुन- मित्रांच्या सहकार्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल. घाईघाईने निर्णय घेऊ नका, जेणेकरून आपल्याला आयुष्यात दु: ख होऊ नये. कर्क- आपल्याला मिळणारा आर्थिक फायदा पुढे ढकलला जाऊ शकतो. प्रेम मिळवण्यात अपयशी ठराल. सिंह -खर्चात अचानक वाढ झाल्यानं चिंतेत असाल. नव्या संधी मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या क्षमता विकसित कऱण्याची गरज आहे. कन्या- प्रिय व्यक्तींची प्रकृती बिघडेल. नवीन उद्योगाची जोखीम उचलू नका. निर्णय घेण्याआधी सल्ला किंवा जवळच्या लोकांचं मत घ्या. तुळ- नव्या संधी, करार आपल्यासाठी फायद्याचे असतील. गुंतवणूक करताना घाईघाईने निर्णय घेऊ नका. वृश्चिक- आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल.प्रिय व्यक्तीला तुमच्या वागण्याचा खूप त्रास होऊ शकतो. धनु- आपल्या भावनांवर, विशेषतः रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायाच्या उद्देशाने केलेला प्रवास फलदायी ठरेल. मकर- लोक तुमची खूप स्तुती करताना दिसतील. आपण कामात एकाग्रता निर्माण करण्याचा प्रयत्न न केल्यास आपण आपले स्थान गमावू शकता. आजचा दिवस आपल्याला खूप ताण असेल. कुंभ- खाण्याकडे लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या. आजचा दिवस आपल्यासाठी खूप व्यस्त असू शकतो. मीन- ध्यान आणि योग शारीरिक आणि मानसिक फायद्यासाठी उपयुक्त ठरतील. घरगुती काम आपल्याला बर्‍याच वेळा व्यस्त ठेवते. संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या