बिहार, 12 सप्टेंबर : बिहारमधील (Bihar Crime News) किशनगंजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेचा सूड उगवण्यासाठी आजीने आपल्या तीन वर्षांच्या नातवाची हत्या (Murder) केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.(Grandmother killed her 3 year old grandson to get revenge on her daughter in law)
सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर याचा खुलासा झाला आणि शेवटी आजीने हत्येची कबुली दिली. ही घटना किशनगंज टाऊन पोलीस ठाणे हद्दीतील आहे. येथील एका तीन वर्षांचा मुलगा तंजील खेळता खेळता अचानक बेपत्ता झाला होता. सायंकाळपर्यंत तंजील घरी परतला नाही तर कुटुंबीय त्याला शोधू लागले. मात्र तो सापडलाच नाही.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 सप्टेंबर रोजी सकाळी 3 वर्षांच्या तंजीलचा मृतदेह त्यांच्या घरापासून काही मिनिटांच्या अंतरावर सापडला. घटनेच्या एक दिवसापूर्वी बाळाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. एका तलावात बाळाचा मृतदेह (Child's Dead body) तरंगत असलेल्या अवस्थेत दिसला. तंजीलचे कुटुंबीय आणि स्थानिकांनी लहानग्याचा मृतदेह पाहून हत्येचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी जेव्हा घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा व्हिडीओमध्ये बाळाला त्याची आजी हात धरून घेऊन जात असताना दिसली. या व्हिडीओमध्ये आजीनेच आपल्या 3 वर्षांच्या नातवाला तलावात ढकललं. यानंतर पोलिसांनी अनेक पुरावे एकत्र केले व आजीविरोधात तक्रार दाखल केली.
हे ही वाचा-गर्भकळांमुळे पत्नी वेदनेने तडफडतेय आणि पठ्ठ्या खातोय McDonald चा बर्गर
पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर शेवटी आजीने आत्मसमर्पण केलं.
आजीने सांगितलं हत्येमागील कारण..
यावेळी आजी म्हणाली की, तिचा सुनेसोबत वाद सुरू होता. तिने जादू-टोना करून मुलाला वश केलं होतं. सुनेचा सूड घेण्यासाठी आजीने 3 वर्षांच्या नातवाची हत्या केली. यानंतर महिलेविरोधात तक्रार करण्यात आली असून तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Crime news, Murder