मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नव्या वर्षात नवे संकट, जानेवारीत कोरोनाचा तिसरी लाट? मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

नव्या वर्षात नवे संकट, जानेवारीत कोरोनाचा तिसरी लाट? मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

 सध्या 10 हजार सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहे. तर गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णात 50 टक्के वाढ झाली आहे.

सध्या 10 हजार सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहे. तर गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णात 50 टक्के वाढ झाली आहे.

सध्या 10 हजार सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहे. तर गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णात 50 टक्के वाढ झाली आहे.

मुंबई, 27 डिसेंबर : राज्यात कोरोनाचा (corona) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या (omicron) रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. तर दुसरीकडे, नवीन वर्षांच्या जानेवारी (January ) महिन्याच्या मध्यात कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या 10 हजार सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहे. तर गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णात 50 टक्के वाढ झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पालकमंत्र्यांना लसीकरणासाठी निर्देश दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढेल अशी काळजी घ्यावी. कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं. तसंच, टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आयोजित करावी असेही त्यांनी निर्देश त्यांनी दिले आहे.

(हेही वाचा - नासासाठी यंदाचं वर्ष कसं होतं? भविष्यातील योजना पाहुन अचंबित व्हाल!)

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी आपल्या सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे असे सांगितलं.

काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला 8 लाख डोसेस देत होतो, सद्या 5 लाख डोसेस दिवसाला दिल्या जातात. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल असे पाहण्याचे निर्देश दिले.

(हेही वाचा - भुवी-उमेशपेक्षा चांगली कामगिरी, 4 मॅचनंतर टीम इंडियातून डच्चू, आता घडवला इतिहास)

'8 डिसेंबर रोजी 6200 सक्रिय रुग्ण होते. मात्र आज 10 हजार सक्रिय रुग्ण आहेत. एकूणच गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णांत 50 टक्के वाढ झाली असून मागील सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती दिली. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 1.06 टक्के झाल्याचेही डॉ व्यास यांनी सांगितलं.

First published: