मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /भुवनेश्वर-उमेशपेक्षा चांगली कामगिरी, 4 मॅचनंतर टीम इंडियातून डच्चू, आता घडवला इतिहास!

भुवनेश्वर-उमेशपेक्षा चांगली कामगिरी, 4 मॅचनंतर टीम इंडियातून डच्चू, आता घडवला इतिहास!

विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Vijay Hazare Trophy) हिमाचल प्रदेशने इतिहास घडवत बलाढ्य तामिळनाडूचा पराभव केला. ऋषी धवनने (Rishi Dhawan) फायनलमध्ये 3 विकेट घेतल्या, याशिवाय त्याने 23 बॉलमध्ये नाबाद 42 रन केले.

मुंबई, 27 डिसेंबर : विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Vijay Hazare Trophy) हिमाचल प्रदेशने इतिहास घडवत बलाढ्य तामिळनाडूचा पराभव केला. हिमाचलने फायनलमध्ये स्टार खेळाडूंची भरती असलेल्या तामिळनाडूला (Himachal vs Tamil Nadu) 11 रननी मात दिली. ऋषी धवनने (Rishi Dhawan) फायनलमध्ये 3 विकेट घेतल्या, याशिवाय त्याने 23 बॉलमध्ये नाबाद 42 रन केले. धवन भारताकडून 4 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला, यात 3 वनडे आणि एका टी-20 मॅचचा समावेश आहे. हिमाचलचा कर्णधार असलेल्या धवनने 2016 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 वनडे मॅचच्या सीरिजमधून पदार्पण केलं. या सीरिजमध्ये त्याला 3 मॅच खेळण्याची संधी मिळाली होती. 2016 साली त्याने झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध धवन यशस्वी ठरला नाही, पण त्याने भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांच्यापेक्षा चांगली बॉलिंग केली होती. तरीही यानंतर त्याला फक्त एक टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्याची संधी मिळाली आणि मग तो टीमबाहेर झाला. 2016 नंतर 31 वर्षांच्या धवनने आंतरराष्ट्रीय मॅच खेळली नाही.

17 जानेवारी 2016 साली त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याचा इकोनॉमी रेट 5.50 चा होता. तर उमेश यादवने 6.91 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली. कॅनबेरामध्ये झालेल्या चौथ्या वनडेमध्ये धवनने 5.88, उमेशने 6.70 आणि भुवनेश्वर कुमारने 8.62 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग टाकली.सीरिजच्या अखेरच्या सामन्यात धवनचा इकोनॉमी रेट 7.40 तर उमेश यादवचा इकोनॉमी रेट 10.25 होता. धवनने या मॅचमध्ये जॉर्ज बेलीची विकेट घेतली होती.

First published:

Tags: Vijay hazare trophy