'तुमच्यामुळे पक्षाची बदनामी होत आहे', राष्ट्रवादीने प्रदेश उपाध्यक्षाला पक्षातून काढून टाकलं!

मंगलदास बांदल यांची 50 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात चौकशी सुरू असल्याने राष्ट्रवादीने त्यांना पक्षातून निलंबित केलं आहे.

मंगलदास बांदल यांची 50 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात चौकशी सुरू असल्याने राष्ट्रवादीने त्यांना पक्षातून निलंबित केलं आहे.

  • Share this:
पुणे, 14 मार्च : राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची 50 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात चौकशी सुरू असल्याने राष्ट्रवादीने त्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. तुमच्यावरील खंडणीच्या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी बांदल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पुणे शहरातील एका नामांकित सराफी व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवीत व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे तब्बल 50 कोटी रुपयांची खंडणीची मागणी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पोलीस चौकशीसाठी बोलवणार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकणात आशिष पवार (वय 27), रमेश पवार (वय 32) आणि रुपेश चौधरी (वय 45) यांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. यातील आशिष पवार हा काही दिवसांपूर्वी सराफांकडे बॉडीगार्ड म्हणून काम करीत होता. पुण्यातील प्रसिध्द सराफ व्यावसायिक सौरभ गाडगीळ यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणात गाडगीळ यांच्या कुटुंबातील महिलेची एक व्हिडीओ क्लिप चोरून बनवण्यात आली होती आणि ती दाखवून गाडगीळ यांना ब्लॅकमेल करण्यात येत होतं. आशिष चौधरी याने पिस्तूल दाखवून सराफांना कोणाकडे वाच्यता केल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतरही सराफाने आम्ही इतकी मोठी रक्कम देऊ शकत नाही असं सांगितल्यावर सराफांना धमकी दिली जात होती. मात्र यानंतर सराफांनी पोलिसांकडे धाव घेतली. यानंतर पोलिसांनी आरोपीचे लोकेशन शोधून काढले. पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. हेही वाचा- शिवसेनेच्या नाराज आमदारांनी केलं अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य, राजकीय वर्तुळात चर्चा या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पोलिस चौकशीसाठी बोलविले जाणार आहे. मंगलदास बांदल हे माजी जिल्हापरिषद सदस्य, बांधकाम समितीचे माजी सभापती आणि शिक्षण समितीचे माजी सभापती आहे. बांदल हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. बांदल हे नेहमीच जिल्ह्याच्या राजकारणात वादग्रस्त राहिले असून यापूर्वी 2017 मध्ये आयकर विभागाने बेहिशेबी मालमत्तेमुळे छापेमारी केली होती.
First published: