मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शिवसेनेच्या नाराज आमदारांनी केलं अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य, राजकीय वर्तुळात चर्चा

शिवसेनेच्या नाराज आमदारांनी केलं अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य, राजकीय वर्तुळात चर्चा

जाधव यांच्या या सारथ्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे.

जाधव यांच्या या सारथ्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे.

जाधव यांच्या या सारथ्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे.

चिपळूण, 14 मार्च : चिपळूणमध्ये आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचं सारथ्य शिवसेनेचे नाराज आमदार भास्कर जाधव यांनी केलं. चिपळूणमधील हेलिपॅडपासून भास्कर जाधव यांच्या घरापर्यंत स्वतः जाधव यांनी गाडी चालवली. यावेळी गाडीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील हेदेखील होते. जाधव यांच्या या सारथ्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे.

चिपळूणमध्ये पोहोचलेल्या अजित पवार यांनी कोरोना व्हायरस आणि त्याअनुषंगाने राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबतही भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील थिएटर बंद ठेवण्याचे आदेश देऊन देखील मुंबईत काही ठिकाणी थिएटर सुरू ठेवण्यात आले आहेत. 'जर कोणी आदेश देऊनदेखील थेटर सुरू ठेवत असतील तर राज्य सरकार कारवाई करेल,' अशी माही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

आमदार भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी ते भोजनासाठी चिपळूण येथे आले होते. 'कोरोनाच संकट हे देशावर आलेले संकट असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन संपवत आहोत. कोरोनाबाबत घाबरून जाऊ नका. गर्दीचे प्रसंग टाळा. गर्दीपासून लांब राहावं,' असं आवाहन देखील अजित पवार यांनी केलं आहे. तसंच शाळा आणि महाविद्यालयांबाबत देखील राज्य सरकार विचार करणार आणि लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

भास्कर जाधव आणि नाराजीनाट्य

राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेनं धक्कातंत्राचा वापर करत गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही. मंत्रिमंडळात डावलण्यात आल्यानंतर भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर शिवसेनेकडून हा वादा खोडून काढण्यात आला होता.

'आमदार भास्कर जाधव यांनी त्यांचे काही म्हणणे मांडले आहे. ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले व येताना श्री. उद्धव ठाकरे यांनी काही शब्द दिल्याचे ते म्हणतात. आमच्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी ‘मंत्री करतो’ असा शब्द दिल्याची माहिती नाही. शिवसेना परिवारात सामील व्हा. एकत्र मिळून राज्य घडवू असा शब्द त्यांनी नक्कीच दिला असावा. बच्चू कडू, शंकरराव गडाख, येड्रावकर यांना दिलेला शब्द पाळला आहे हे दिसलेच आहे. मंत्रिमंडळ तीन पक्षांचे आहे. त्यामुळे शब्द देण्यावर मर्यादा होत्या,' अशी भूमिका 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून मांडण्यात आली होती.

First published:
top videos