मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO : महिलांकडून खडसे समर्थकाला मराहाणीनंतर पोलीस ठाण्यात राडा, कार्यकर्त्यासाठी रोहिणी खडसे मैदानात

VIDEO : महिलांकडून खडसे समर्थकाला मराहाणीनंतर पोलीस ठाण्यात राडा, कार्यकर्त्यासाठी रोहिणी खडसे मैदानात

एका तरुणाला महिलांनी भर रस्त्यात प्रचंड मारहाण केली. या घटनेवरुन मुक्ताईनगरचं वातावरण चांगलंच तापलं आहे.

एका तरुणाला महिलांनी भर रस्त्यात प्रचंड मारहाण केली. या घटनेवरुन मुक्ताईनगरचं वातावरण चांगलंच तापलं आहे.

एका तरुणाला महिलांनी भर रस्त्यात प्रचंड मारहाण केली. या घटनेवरुन मुक्ताईनगरचं वातावरण चांगलंच तापलं आहे.

जळगाव, 22 जुलै : जळगावच्या मुक्ताईनगर येथील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोन महिला एका तरुणाला प्रचंड मारहाण करताना दिसत आहेत. महिला संबंधित तरुणाला चप्पलांनी देखील चोप देत असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे व्हिडीओतील ज्या तरुणाला मारहाण होत आहे ती व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा समर्थक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या तरुणाला मारहाण करणाऱ्या महिलेने आपले बदनामी करणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिलेला अटक करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाण्यात जावून गोंधळ घातला. या आंदोलकांमध्ये एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या देखील होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या महिलेला तातडीने अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यासाठी आंदोलकांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं. पण पोलीस आपल्या आंदोलनाची दखल घेत नाही हे पाहिल्यानंतर आंदोलक चांगलेच भडकले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन चिघळलं. संतप्त झालेल्या आंदोलकांनी थेट पोलीस निरीक्षकांच्या कक्षात प्रवेश करत ठिय्या मांडला. यावेळी पोलीस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली.

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या समर्थकाला महिलांनी भर चौकात चोप दिल्याची धक्कादायक प्रकार मुक्ताईनगरमध्ये घडला. संबंधित खडसे समर्थक हा एका नगरसेविकेचा मुलगा होता, अशी देखील माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुक्ताईनगरमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार होती. पण न्यायालयाच्या आदेशाने ही निवडणूक स्थगित झाली आहे. त्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला आहे.

महिलांकडून ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली तो तरुण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचं अमीन शेख असं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तो एका नगरसेविकेचा मुलगा असल्याचा देखील दावा करण्यात येतोय. ज्या महिलांनी शेखला मारहाण केली त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. संबंधित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट करत व्हायरल केल्याच्या आरोपाखाली महिलांनी त्याला चोप दिला. आम्ही तुम्हाला निवडून देतो आणि तुम्ही असे प्रकार करता? असा सवाल मारहाण करणाऱ्या महिलांनी केला आहे.

(मित्रांसोबत मस्ती भोवली, तोल गेला; ट्रेनला धडक, आणि... कांदिवली रेल्वे स्थानकावरचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO)

या घटनेवरुन मुक्ताईनगरचं वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेनंतर मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील चांगलेच आक्रमक झाले असून कार्यकर्त्यांनी थेट पोलीस निरीक्षक कक्षात ठिय्या आंदोलन केल्याने पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये देखील बाचाबाची झाली.

दरम्यान, या घटनेत कार्यकर्ता हा जखमी झाला असून त्यास जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी जिल्हा रुग्णालयात जखमी कार्यकर्त्याची भेट घेऊन विचारपूस केली.

मुक्ताईनगर येथे एकनाथ खडसे यांच्या कार्यकर्त्यास भर चौकात एका महिलेने फोटो व्हायरल केल्याच्या आरोपावरून चांगला चोप दिला होता या घटनेनंतर मुक्ताईनग मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील चांगलेच आक्रमक झाले असून कार्यकर्त्यांनी थेट पोलीस निरीक्षक कक्षात ठिय्या आंदोलन केल्याने पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये देखील बाचाबाची झाली. याबाबत एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांने सोशल मीडियावर पोस्ट फॉरवर्ड केली त्यात अश्लील काही नाही. त्यामुळे मारहाण करणाऱ्या महिलेला दोषी ठरवत एकनाथ खडसे यांनी आपल्या कार्यकर्त्याची मात्र पाठराखण केली आहे.

First published:

Tags: Eknath khadse, NCP