जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रात नाही तर थेट दिल्लीत खलबतं, अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय होणार

राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रात नाही तर थेट दिल्लीत खलबतं, अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय होणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रात नाही तर थेट देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : राज्यातील राजकारणात रोज काहीतरी नवनव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यात दोन महिन्यांपूर्वी तर फार मोठा भूकंप घडलेला आपण पाहिला. महाराष्ट्रात दोन महिन्यांपूर्वी सत्तांतर झालं. या घडामोडी ताज्या असताना महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पक्षांमधील एक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून फार महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रात नाही तर थेट देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उद्या दिल्लीतच राष्ट्रीय अधिवेशन भरवण्यात आलं आहे. त्याआधी आज कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मोठे नेते बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात पक्षाचा नव्या राष्ट्रीय अध्यक्षाबद्दल ठराव मांडण्यात येणार आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीत अध्यक्षपदाबाबत ठराव मांडण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कायम राहणार आहेत. त्याबाबतचा ठराव या बैठकीत घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ( ‘बारामती जिंकणं अवघड नाही, मोदींचा पराभव होणार नाही’, कामगार मंत्र्यांचा दावा ) राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. भाजपची तयारी पाहता इतर पक्षांपुढे मोठं आव्हान असणार आहे. या आव्हानांचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही कामाला लागला आहे. विशेष म्हणजे भाजप पक्ष आगामी 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत जोरदार तयारीला लागला आहे. त्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असल्याचं चित्र आहे. त्यातूनच राष्ट्रवादीचं उद्या दिल्लीत अधिवेशन आयोजित करण्यात आल्याचं मानलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात