मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /NCP च्या पदाधिकाऱ्याने ऑफिसमध्येच संपवलं जीवन; सुसाइड नोटमधून धक्कादायक खुलासा

NCP च्या पदाधिकाऱ्याने ऑफिसमध्येच संपवलं जीवन; सुसाइड नोटमधून धक्कादायक खुलासा

हणमंत दनाणे असं आत्महत्या करणाऱ्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे.

हणमंत दनाणे असं आत्महत्या करणाऱ्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे.

Suicide in Osmanabad: उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) एका पदाधिकाऱ्याने कार्यालयातच आपल्या आयुष्याचा शेवट (office bearer commits suicide) केला आहे.

लोहारा, 27 सप्टेंबर: उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील लोहारा (Lohara) याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) एका पदाधिकाऱ्याने कार्यालयातच आपल्या आयुष्याचा शेवट (office bearer commits suicide) केला आहे. कार्यालयात कुणीही नसताना संबंधित पदाधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. यावेळी पोलिसांना कार्यलयातील टेबलवर सुसाइड नोट (Suicide note found) मिळाली असून यामध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्वरित गावातील दोन महिलांसह एका पुरुषाला अटक (3 arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हणमंत दनाणे असं आत्महत्या करणाऱ्या पदाधिकाऱ्याचं नाव असून संबंधित घटना लोहारा तालुक्यातील वडगाव येथील कार्यालयात घडली आहे. मृत दणाने हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस होते. शनिवारी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान त्यांनी आपल्या कार्यालयात गळफास घेत आत्महत्या केली आहे. साडे दहाच्या सुमारास शशिकांत डोलारे नावाचा युवक कार्यालयात पोहोचला असता, ही घटना उघडकीस आली आहे.

हेही वाचा-डोंगराच्या पायथ्याशी आढळला मृतदेह; दारुची बाटली अन् गुलाबात दडलंय मृत्यूचं गूढ

संबंधित प्रकार लक्षात येताच शशिकांत यांनी त्वरित या घटनेची माहिती मृत दनाणे यांच्या वडिलांना दिली आहे. दनाणे यांच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली असता, मुलाने केलेला प्रकार पाहून त्यांच्या पायाखालची जमिनच हादरली. यानंतर मृत दनाणे यांच्या वडिलांनी संबंधित घटनेची माहिती लोहारा पोलीस ठाण्याला कळवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

हेही वाचा-पुण्यातील तरुणीला अमेरिकेला नेत अमानुष छळ; बँक खात्यातून परस्पर काढले 48 लाख

यावेळी पोलिसांना कार्यलयातील एका टेबलवर सुसाइड नोट आढळली आहे. मृत दनाणे यांनी या नोटमध्ये आत्महत्येचं कारण स्पष्ट केलं आहे. गावातील मायादेवी दत्तात्रय गायकवाड, दत्तात्रय कचराप्पा गायकवाड, स्वाती दत्तात्रय गायकवाड यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: Crime news, NCP, Osmanabad, Suicide