मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बुलडाण्यात डोंगराच्या पायथ्याशी आढळला मृतदेह; दारुची बाटली अन् गुलाबात दडलंय मृत्यूचं गूढ

बुलडाण्यात डोंगराच्या पायथ्याशी आढळला मृतदेह; दारुची बाटली अन् गुलाबात दडलंय मृत्यूचं गूढ

मिलिंद नामदेव शिरसाट असं आत्महत्या करणाऱ्या 45 वर्षीय शिक्षकाचं नाव आहे. (File Photo)

मिलिंद नामदेव शिरसाट असं आत्महत्या करणाऱ्या 45 वर्षीय शिक्षकाचं नाव आहे. (File Photo)

Crime in Buldhana: बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एका डोंगराच्या पायथ्याला 32 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk

बुलडाणा, 26 सप्टेंबर: बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एका डोंगराच्या पायथ्याला 32 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याची (Dead Body found) घटना उघडकीस आली आहे. या मृतदेहाच्या शेजारी दारूची बाटली (bottle of liquor), गुलाबाचं फुल (Rose), अगरबत्तीचा पुडा आणि एक ब्लाऊज आढळल्याने संबंधित तरुणाच्या मृत्यूबाबत गूढ बनलं आहे. गावातील एका शेतकऱ्याने मृतदेह पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी मृतदेहाजवळ आढळलेल्या वस्तू जप्त केल्या आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संतोष टवरे असं 32 वर्षीय मृत तरुणाचं नाव असून तो संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बानोदा गावातील रहिवासी आहे. मृतदेहाजवळ आढळलेल्या आधारकार्डवरून पोलिसांनी मृताची ओळख पटवली आहे. मृतदेहावर काही रक्ताचे डाग देखील होते. त्यामुळे संतोष यांच्यासोबत काहीतरी घातपात झाला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही.

हेही वाचा-पुण्यातील ढोल पथकाला हैदराबादमध्ये ठेवलं डांबून; थरारनाट्यानंतर 60 जणांची सुटका

नेमकं काय घडलं?

खरंतर, खामगाव तालुक्यातील गारडगाव हा डोंगराळ भाग आहे. काल दुपारच्या सुमारास गावातील एक शेतकरी आपल्या शेतात गेले होते. दरम्यान त्यांना गारडगाव शिवारातील एका डोंगराच्या पायथ्याला 32 वर्षीय युवक मृतावस्थेत आढळला. यानंतर संबंधित शेतकऱ्यांने तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाची पाहाणी केली असता, त्यांनी मृतदेहापासून काही अंतरावर चप्पल, एक छोटी दारुची बाटली, एक गुलाबाचं फुल, ब्लाऊज आणि अगरबत्तीचा पुडा आढळला आहे.

हेही वाचा- खरी ओळख लपवत पत्नीने शरीरसंबंधास दिला नकार; 3 महिन्यांनी फुटलं बिंग, पतीची कोर्टात धाव

तसेच यावेळी मृतदेहाजवळ आढळलेल्या आधारकार्डवरून संबंधित व्यक्ती संतोष टवरे असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. याशिवाय मृतदेहावर काही ठिकाणी रक्ताचे डाग देखील आढळले आहेत. त्यामुळे टवरे यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत घातपात घडला? याबाबत गूढ निर्माण झालं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Buldhana news, Crime news