खासदार अमोल कोल्हे यांनी केली कोरोना टेस्ट, रिपोर्ट आल्यानंतर केलं महत्त्वाचं ट्वीट

खासदार अमोल कोल्हे यांनी केली कोरोना टेस्ट, रिपोर्ट आल्यानंतर केलं महत्त्वाचं ट्वीट

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कोरोना टेस्ट केली आहे.

  • Share this:

मुंबई, 8 जुलै: कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कोरोना टेस्ट केली आहे. खासदार कोल्हे यांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तरी देखील त्यांनी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे.

खासदार अमोल कोल्हे हे खबरदारी म्हणून होम क्वारंटाईन होत आहेत. याबाबत त्यांनी एक ट्वीट केलं आहे. माझ्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. सार्वजनिक कार्यक्रमात अथवा दौऱ्यावर असताना, अनेकदा नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. काही जण मास्कचा वापर करीत नाहीत. असेही कोल्हे यांनी म्हटलं आहे. पुरेशी खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतल्याचं खासदार कोल्हे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा...15 Dec पर्यंत बिनव्याजी मुदतवाढ; कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मोठा निर्णय

'आपल्याला एक महत्वाची माहिती शेअर करत आहे. एक जुलै ते चार जुलै या कालावधीत मतदारसंघाच्या दौऱ्यावर होतो. दौऱ्याच्या काळात संपर्क आलेले दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळाले. हे समजल्यानंतर मी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली असून ती निगेटिव्ह आलेली आहे.' अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली.

'मी स्वतः डॉक्टर असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये या भावनेतून मी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मी घरी असलो तरी माझ्या मतदारसंघाबरोबर इतर भागातील नागरिकांच्या संपर्कात राहून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे., असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा...बाळासाहेब ठाकरे यांचा 'सामना' आता शिल्लक राहिला नाही, फडणवीसांचा घणाघात

राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील दादर येथील निवासस्थान 'राजगृह' याठिकाणी काही अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड करून नुकसान केल्याचे कळले. राजगृह अनेकांचे प्रेरणास्थान आहे,जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध, असं ट्वीट खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 8, 2020, 7:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading