कोल्हापूर, 27 डिसेंबर : राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth pawar) यांना पंढरपूरमधून पोटनिवडणुकीत (pandharpur by poll election) उमेदवारी देण्याची चर्चा रंगली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. पार्थ यांच्या उमेदवारीबाबत अशी कोणतीही चर्चा नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुलाच्या स्वप्नासाठी रोज 2 किमी चालायची आई, आज आहे टीम इंडियाची 'भिंत'
पार्थ पवार यांच्या उमेदवारीबद्दल पत्रकारांनी जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, 'मी राष्ट्रवादी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. अशी कोणतीही चर्चा माझ्या स्तरावर झाली नाही' असं पाटील यांनी स्पष्ट केले.
'पार्थ पवार यांच्याबद्दल अमरजित पाटील यांनीच मागणी केली आहे. पण हा आमच्या पक्षांतर्गत मुद्दा आहे. त्यांच्या मागणीबद्दल पक्षातील ज्येष्ठ नेते बसून निर्णय घेतील', असंही पाटील यांनी स्पष्ट केले.
काय आहे राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी?
पंढरपूरच्या पोटनिवडणुकीमध्ये पार्थ पवार यांना जर उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीचा विजय हा आणखी सोपा होईल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेते अमरजीत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
झोपेत असताना मंदिरात लागली आग, बाहेर पळाले पण गेटवरच मृत्यूने गाठले
तसंच, पार्थ पवार यांना जर उमेदवारी देण्यात आली तर प्रशांत पारिचारक पार्थ यांना पाठिंबा देण्यासाठी रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांची नुकतीच पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड केली आहे. भगिरथ भालके यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली असती, तर लोकांच्या सहानुभुतीचा फायदा त्यांना झाला असता. पण, पोटनिवडणुकीऐवजी पुढील निवडणुकीत भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन राष्ट्रवादीकडून दिले असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये येऊन हा संभ्रम दूर केला होता. भगिरथ भालके यांचं वय आणि अनुभव नसल्यामुळे पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यास तुर्तास टाळले आहे. प्रशांत पारिचारक गट गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपुरात सक्रिय आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटातूनच पार्थ पवार यांच्या नावाची पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी मागणी केली आहे.