जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अजित पवारांकडे मतदारसंघातील कामे घेऊन गेले रोहित पवार, असा होता प्रतिसाद

अजित पवारांकडे मतदारसंघातील कामे घेऊन गेले रोहित पवार, असा होता प्रतिसाद

अजित पवारांकडे मतदारसंघातील कामे घेऊन गेले रोहित पवार, असा होता प्रतिसाद

अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात अधून-मधून वर येत असतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 जानेवारी : राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून विजय मिळवत विधानसभेत धडक दिली आहे. रोहित पवार यांचे काका अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात अधून-मधून वर येत असतात. राष्ट्रवादीने मात्र सातत्याने ही चर्चा खोडून काढली आहे. अशातच आता मतदारसंघातील कामे घेऊन अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर कसा अनुभव आला, याबाबत रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. ‘प्रशासनावर घट्ट पकड असलेला, प्रश्नांचा बारकाईने अभ्यास असलेला, कामाचा उरक आणि जबरदस्त निर्णयक्षमता असलेला नेता म्हणून संपूर्ण राज्यात अजितदादांना ओळखलं जातं. अनेकांनी त्यांच्या या गुणांचा अनुभव घेतलेला आहे. कालही माझ्या कर्जत-जामखेड या मतदारसंघातील वेगवेगळ्या कामांसाठी आणि इतर सामाजिक संघटनांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात दादांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत एका बैठकीला उपस्थित राहण्याचीही संधी मला मिळाली. यावेळीही दादांची काम करण्याची अनोखी शैली मला परत एकदा प्रत्यक्ष जवळून अनुभवायला मिळाली. एखादा विषय लांबवत नेण्यापेक्षा तो लगेच कसा सुटेल, यावर दादांचा नेहमी कटाक्ष असतो,’ असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. राज ठाकरेंचं महाअधिवेशन सुरू असतानाच राष्ट्रवादीने केला पहिला घणाघाती हल्ला ‘अजित दादांचा हा गुण मला भावतो’ ‘एखाद्या निर्णयामुळे लोकहित साधलं जात असेल तर अन्य कशाचीही पर्वा न करता अजितदादा निर्णय घेऊन मोकळे होतात. त्यांच्यासाठी लोकांची सोय ही अधिक महत्त्वाची असते. राज्याच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य लोक थेट दादांकडे इतक्या आत्मविश्वासाने का जातात, याचं उत्तर दादांच्या काम करण्याच्या या शैलीतून मिळतं. दादांचा हा गुण मला नेहमीच खूप भावतो,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात