जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज ठाकरेंचं महाअधिवेशन सुरू असतानाच राष्ट्रवादीने केला पहिला घणाघाती हल्ला

राज ठाकरेंचं महाअधिवेशन सुरू असतानाच राष्ट्रवादीने केला पहिला घणाघाती हल्ला

राज ठाकरेंचं महाअधिवेशन सुरू असतानाच राष्ट्रवादीने केला पहिला घणाघाती हल्ला

झेंड्याचा रंग भगवा केल्यानंतर मनसे आता आपला मोर्चा हिंदुत्वाकडे वळवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 जानेवारी : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन मुंबईत पार पडत आहे. राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं आहे. झेंड्याचा रंग भगवा केल्यानंतर मनसे आता आपला मोर्चा हिंदुत्वाकडे वळवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच राष्ट्रवादीने राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘कोणता झेंडा घेऊ हाती, अशी अवस्था राज ठाकरे यांची झाली आहे. शाडो कॅबिनेट म्हणजे लहान माझी बाहुली तिची मोठी सावली असा प्रकार आहे. सभांना जमणारी गर्दी कार्यकर्त्यांमध्ये कशी रूपांतरित होईल यासाठी राज ठाकरे यांनी प्रयत्न करावेत. एकांगी कारभार करायची सवय असेल तर पदाधिकाऱ्यांची फळी उभी राहत नाही हे गणित राज ठाकरे यांनी समजून घ्यावे,’ असा खोचक टोला राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार हेमंत टकले यांनी लगावला आहे. मनसेच्या नव्या अवतारावर काय आहे काँग्रेसची प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला अजेंडा बदलण्याचं निश्चित केल्यानंतर त्याचे महाराष्ट्रभर पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसनंही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मनसेनी पक्षाच्या झेंड्यात राजमुद्रेचा वापर करणं गैर आहे. अमित ठाकरे यांची राजकारणात झालेली एण्ट्री हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, कोणास संधी द्यावी हे त्यांनी ठरवावे,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे. ‘राज’पुत्राची राजकारणात एण्ट्री! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुपुत्र अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. 14 वर्षांनंतर मनसेचा महाअधिवेशन मेळावा होत आहे. या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये पहिल्यांदाच अमित ठाकरेंवर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. ‘27 वर्षांत पहिल्यांदाच मी जाहीर व्यासपीठावर बोलत आहे. तुम्ही सर्वांनी आज आणि याआधीही मला जे प्रेम दिलं आहे, ते भविष्यातही द्याल, यासाठी मी आई जगदंबाचरणी प्रार्थना करतो,’ असं म्हणत अमित ठाकरे यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात