• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • आईला सॅल्युट करून शेवटची ड्युटी बजावली आर.आर.पाटील यांच्या भावाने, फोटो व्हायरल

आईला सॅल्युट करून शेवटची ड्युटी बजावली आर.आर.पाटील यांच्या भावाने, फोटो व्हायरल

सेवेतला बहुतांश काळ हा साईड पोस्टिंग मध्येच काम त्यांनी केले आणि कधीही आबांकडे त्यांनी कोणती मागणी केली नाही.

सेवेतला बहुतांश काळ हा साईड पोस्टिंग मध्येच काम त्यांनी केले आणि कधीही आबांकडे त्यांनी कोणती मागणी केली नाही.

सेवेतला बहुतांश काळ हा साईड पोस्टिंग मध्येच काम त्यांनी केले आणि कधीही आबांकडे त्यांनी कोणती मागणी केली नाही.

  • Share this:
कोल्हापूर, 01  ऑक्टोबर  : राष्ट्रवादीचे (ncp) दिवंगत नेते आणि  माजी गृहमंत्री आर.आर.पाटील (r r patil) यांचे बंधू पोलीस अधिकारी राजाराम पाटील (rajaram patil) हे निवृत्त झाले आहेत. त्यांच्या निवृत्तीचा समारंभ हा भावनिक आणि अविस्मरणीय ठरला आहे. राजाराम पाटील यांनी आपल्या सेवेतील शेवटच्या दिवशी ड्युटी बजावण्यासाठी आईला केलेलं सॅल्युट हा हृदयस्पर्शी ठरला आहे. आपल्या सरळ आणि स्वच्छ प्रतिमेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला आर.आर.पाटील यांनी आपलसं केलं होतं. गृहमंत्री म्हणून त्यांची कार्य महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद करून ठेवणारी ठरली आहे. अशा दिग्गज माजी गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम पाटील अर्थात आर.आर.पाटील हेही तितकेच सरळ आणि संयमी आहे. आर.आर. पाटील यांच्या आई भागिरथी पाटील यांच्यावरील प्रेम आर.आर.पाटील ह्यात असताना अनेकवेळा पाहायला मिळाले होते. आता आर.आर पाटील यांचे बंधू राजाराम पाटील यांचे देखील आईवरील प्रेम दिसून आले आहे. आर आर पाटील यांचे बंधू आणि करवीरचे पोलीस उपअधीक्षक राजाराम पाटील यांच्या पोलीस दलातील सेवेचा गुरुवारी शेवटचा दिवस होता.

हार्दिकच्या फिटनेसची चिंता, हा खेळाडू होईल 'ऑलराऊंडर', गावसकरांना विश्वास

पोलीस दलातील आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर  राजाराम पाटील सेवानिवृत्त (Rajaram Patil retired) झाले. पोलीस दलातील आपला शेवटच्या दिवशी आई  भागिरथी यांना सॅल्युट करुन राजाराम पाटील सेवा बजावण्यासाठी दाखल झाले. ज्या आईने अनेक संकटाला सामोरे जात शिकवलं व घडवलं तिला सॅल्युट करुन काही प्रमाणात आईच्या उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न राजाराम पाटील यांच्या या कृतीतून पाहायला मिळाला आहे. मन ताजंतवानं, निरोगी राहण्यासाठी झोप आहे खूप महत्त्वाची; वाचा या टीप्स नोकरीच्या शेवटच्या दिवशी आईला सॅल्युट करुन तिचा सन्मान केल्याचा फोटो देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.  कोल्हापूर पोलीस मुख्यालयात राजाराम पाटील यांच्या सेवानिवृत्तीचा छोटेखानी समारंभ पार पडला आणि या समारंभामध्ये राजाराम पाटील यांच्या आई भगीरथी पाटील यांना आपले अश्रू अनावर झाले. आबा गृहमंत्री असताना कधीही गृहमंत्र्यांचे भाऊ म्हणून न मिरवता त्यांनी काम केले आणि नेहमीच त्यांनी ते अंतर ठेऊन काम केले. सेवेतला बहुतांश काळ हा साईड पोस्टिंगमध्येच राजाराम पाटील यांनी सेवा बजावली. कधीही त्यांनी आबांकडे कोणती मागणी केली नाही, हे मात्र अगदी ठळकपणे सांगायला मला आवडेल, असं आवर्जुन राजाराम पाटील यांनी आपल्या सेवानिवृत्त समारंभात बोलताना सांगितलं. रोहित पाटील यांची भावनिक पोस्ट 'आज माझे मोठे चुलते राजाराम (तात्या) पाटील सेवानिवृत्त होत आहेत. व्यक्तिगत माझ्या आयुष्याला बहुतांश आकार आणि शिकवण ज्यांनी दिली त्या तात्यांची आज सेवानिवृत्ती. कुटुंब म्हणून आम्हा सर्वांसाठी हा अत्यंत भावनिक क्षण आहे आणि त्याची पार्श्वभूमी सुद्धा काहीशी तशीच आहे. सुरुवातीच्या काळात भरती पूर्व परीक्षेत पास झाल्यानंतर ज्यावळेस ही बातमी त्यांनी आबांच्या कानावर घातली होती. त्यावेळेस आबांच्या डोळ्यातून अश्रू आलेला किस्सा आज सुद्धा सांगताना त्यांचे डोळे भरून येताना मी पाहिलं आहे. घरचा पहिलाच सरकारी पगार असलेली व्यक्ती म्हणून आबांना सुद्धा नेहमी त्यांचा अभिमान होता. मराठी इंडियन आयडलचे परीक्षण करणार अजय-अतुल; काय झोकात केली घोषणा पाहा.. सेवेतला बहुतांश काळ हा साईड पोस्टिंग मध्येच काम त्यांनी केले आणि कधीही आबांकडे त्यांनी कोणती मागणी केली नाही. हे मात्र अगदी ठळकपणे सांगायला मला आवडेल. कधी कधी त्यांच्या सेवा काळाबद्दल विचार केला तर गृहमंत्र्यांचे भाऊ म्हणून काम करताना त्याचे काही तोटे सुध्दा असू शकतात हे लक्षात येतं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांनी तयार केलेला लोकांचा संग्रह आणि तेथील लोकांना त्यांच्याबद्दल असणारी आपुलकी हीच त्यांच्या कामाची पोच पावती आहे, असं मला नेहमी वाटतं. आज सेवेत असताना शेवटचे ऑफिसकडे जाताना त्यांना खूप कष्ट करून शिकवलेल्या माझ्या आज्जीला सॅल्युट करून ते रवाना झाले. आर आर आबांचा मुलगा म्हणून जेवढा अभिमान आहे तितकाच आभिमान डी.वाय.एस. पी आर आर तात्यांचा पुतण्या म्हणून आहे आणि राहील एवढच आजच्या दिवशी मला त्यांना सांगायचंय."
Published by:sachin Salve
First published: