मुंबई, 1 ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरिल हिंदी सिंगिंग रिॲलिटी शो इंडियन आयडल चे ते सर्वच फॅन आहेत. पण आता सोनी मराठी वाहिनीवर वर ‘इंडियन आयडल मराठी’ शो पहिल्यांदाच प्रेक्षकांसाठी अजय अतुल घेऊन येत आहेत. कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘इंडियन आयडल - मराठी’ ही स्पर्धकांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. शिवाय या कार्यक्रमाचे परीक्षणही मराठी, हिंदी संगीतसृष्टीत गाजलेली दिग्गज जोडी अजय -अतुल करणार आहे.
पुण्यातील नारायण पेठ येथे भित्तचित्राव्दारे मोठे पोस्टर या शोच्या परीक्षकांची घोषणा करण्यात आली. पोटरच्या उद्घटनावेळी तिथे पुण्याचे महापौर श्री. मुरलीधर मोहोळ, सोनी मराठी वाहिनीचे बिजनेस हेड श्री. अजय भाळवणकर, क्रिएटिव्ह डिरेक्टर श्री.अमित फाळके आणि फ्रीमेन्टल निर्मिती संस्थेचे केशव कौल उपस्थित होते. आपल्या संगीतानं या जोडीनं महाराष्ट्रात अवघ्या देशात सर्वांची मने जिंकली आहेत. या जोडीनी आपल्या सांगीतिक प्रवासाला पुण्यातूनच सुरुवात केली. त्यामुळे पुण्यात या दोघांचं नाव ‘इंडियन आयडल - मराठी’ या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
मराठी मनोरंजन क्षेत्रात पहिल्यांदाच अशा प्रकारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. VIDEO: राणू मंडलने गायलं नवं गाणं, Manike Mange Hite मुळे पुन्हा होतेय ट्रेंड पुणे शहरात या भित्तिचित्राची सगळीकडे चर्चा तर आहेच. पण त्याचबरोर ‘इंडियन आयडल- मराठी’ ची सुद्धा चर्चा सर्वत्र रंगली आहे. निखिल सतिश खैरनार या कलाकाराने हे भित्तिचित्र काढले आहे.
‘अजय-अतुल’ या जोडीनी आत्तापर्यंत उत्तम आणि दर्जेदार संगीत महाराष्ट्राला दिली आहेत. हा मंच आता सोनी मराठी वाहिनीनी मराठीमध्ये प्रेक्षकांसाठी आणला जात आहे. शिवाय या शो ला मंचाला ‘अजय-अतुल’ हे गुणकारी परीक्षक मिळाले आहेत. फ्रीमेन्टल या निर्मिती संस्थेनी ‘इंडियन आयडल - मराठी’ या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. ‘इंडियन आयडल - मराठी’ या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सोनी लिव्हवर सुरू झाल्या आहेत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहेत.