जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / काल बॅनर आज थेट मोठी ऑफर; आव्हाडांचे निकटवर्तीय नजीब मुल्ला शिंदे गटात जाणार?

काल बॅनर आज थेट मोठी ऑफर; आव्हाडांचे निकटवर्तीय नजीब मुल्ला शिंदे गटात जाणार?

काल बॅनर आज थेट मोठी ऑफर; आव्हाडांचे निकटवर्तीय नजीब मुल्ला शिंदे गटात जाणार?

नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे विश्वासू मानले जातात. तसेच ते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे, 21 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि ठाणे महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात शुभेच्छा पोस्टर उभारण्यात आले होते. मात्र या पोस्टरवर राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याचा फोटो नव्हता. या पोस्टरवर शिंदे गटातील नेत्यांचे फोटो असल्यानं चर्चेला उधाण आलं होतं. हे पोस्टर लावल्यानंतर नजीब मुल्ला हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा देखील सुरू झाली होती. या बॅनरवर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि माजी नगरसेवक राजन केणे यांचा फोटो लावण्यात आला होता. नरेश मस्के यांनी नेमकं काय म्हटलं?  दरम्यान त्यानंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी एक कविता म्हणत नजीब मुल्ला यांना थेटऑफरच दिली आहे. नजीब मुल्ला हे नगरसेवकाचे आमदार व्हावे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे, असं नरेश मस्के यांनी म्हटलं आहे. त्यांनी एक कविता यावेळी केली आहे. ठाणे महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते नजीब मुल्ला यांना जितेंद्र आव्हाडांसोबत रहायच आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यायचं? हे ठरवावे लागेल, असं कवितेतून मस्के यांनी म्हटलं आहे. हेही वाचा :  ठाण्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार; बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर? आव्हाडांना धक्का! मस्के यांची कविता  ‘मार्ग तुझा रोखू शकेल असा कोण जन्मालाच नाही, तुझा मार्ग तुला ठरवण्याचा अधिकारच आहेच ना रे भाई, ठरव आता बुडत्या जहाजात बसायचं की महाराष्ट्रात एक झुंझार नेता म्हणून दिसायचं!’ अशी कविता नरेश मस्के यांनी म्हटली आहे. कोण आहेत नजीब मुल्ला?  नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे विश्वासू मानले जातात.  तसेच ते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. नजीब मुल्ला हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राबोडी विभागाचे माजी नगरसेवक आणि ठाणे महापालिकेचे गटनेते आहेत. वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरमुळे नजीब मुल्ला हे शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात