मुंबई, 7 नोव्हेंबर: राज्य सरकारनं (Maharashtra Government) मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) खेळखंडोबा करून मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. हा प्रकार राज्य सरकारला निश्चितच महागात पडणार, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर शरसंधान साधलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ट्वीट (Tweet)करत सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
हेही वाचा...व्होरा समितीचा अहवाल प्रसिद्ध होताच उद्धव ठाकरे सरकार पडेल, भाजप नेत्याचा दावा
राज्य सरकारने 2020-21 या शैक्षणिक वर्षातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे नोटिफिकेशन 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलं होतं. याशिवाय मराठा आरक्षण EWS अंतर्गत देण्याचं आश्वासनही दिलं होतं. मात्र, त्यांनी मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी SEBC प्रवर्गाचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही. इतर आरक्षित असलेल्या सर्व प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे, ही अतिशय धक्कादायक बाब असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करून मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांचं हे पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार त्यांना निश्चितच महागात पडणार आहे. pic.twitter.com/df2EJTWElz
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 7, 2020
अकरावी, इंजिनिअरिंग, मेडिकल अशा सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत. मराठा तरुणांचं भवितव्य अंधारमय होत चाललं आहे. मात्र, बिनकामी राज्य सरकारला याची किंचितसुद्धा पर्वा नाही. राज्य सरकारच्या या धोरणांमुळे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही, हे सिद्ध होतं आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
सत्तेचा माज सोडून तरुणांच्या भविष्याचा विचार करा..
राज्य सरकारने आतातरी सत्तेचा माज सोडून मराठा तरुणांच्या भविष्याचा विचार करा. अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला की इतिहास घडतो, हे देशाने पाहिलं आहे, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
हेही वाचा...उर्मिला मातोंडकरांना या कारणांमुळे शिवसेनेने दिली उमेदवारी, संजय राऊत म्हणाले...
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडकणार मशाल मोर्चा
मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यासाठी मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला आहे. आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्यसरकार काहीच प्रयत्न करीत नाही, असा आरोप मराठा समाजाकडून केला जात आहेत. अशात राज्यातील सरकारला जागे करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने शनिवारी सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानी 'एक मराठा, लाख मराठा' म्हणत मशाल मोर्चा धडकणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrakant patil, Maratha kranti morcha, Maratha reservation, Protest maratha kranti morcha, Udhav thackarey