मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Fertilizer Rate Hike : केंद्राने मोडलं शेतकऱ्यांचं कंबरडं, जयंत पाटलांचा प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनाचा इशारा

Fertilizer Rate Hike : केंद्राने मोडलं शेतकऱ्यांचं कंबरडं, जयंत पाटलांचा प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनाचा इशारा

Fertilizer Rate Hike कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. देशभरातील इतर शेतकरी देखील मोठ्या संख्येने केंद्र सरकारविरोधात आवाज उचलतील अशी आम्हाला आशा आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 16 मे : पेट्रोल डिझेलचे भाव (Petrol Diesel Rate) आकाशाला भिडत असतानाच केंद्र सरकारने (Central Government) खतांच्या किमती (Fertilizer Rate Hike) वाढवून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. आधीच अडचणीत असलेला शेतकरी (Farmer) यामुळं आणखी अडचणीत सापडणार आहे. त्यामुळं सरकारनं ही दरवाढ कमी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. अन्यथा प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन हाती घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

(वाचा-कोरोनाबरोबरच चक्रीवादळाशीही संघर्ष; गोव्यात कोविड सेंटरमध्ये घुसलं पावसाचं पाणी)

भारतात पेट्रोलच्या किमती अत्यंत झपाट्याने वाढत आहेत. इंधनाचे दर आकाशाला टेकले आहेत. पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्यावर गेलेले आहेत. मात्र असं असतानाही केंद्र सरकारनं सामान्यांना आणि विशेषतछ शेतकऱ्यांना आणखी एख मोठा धक्का दिला आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम भारत सरकारने केले आहे. देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढविण्याचं पाप भाजप सरकारनं केले असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या दरवाढीचा निषेध म्हणून याविरोधात राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन हाती घेणार असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत ही दरवाढ कमी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. कोरोनामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून केंद्राने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. देशभरातील इतर शेतकरी देखील मोठ्या संख्येने केंद्र सरकारविरोधात आवाज उठवतील अशी आम्हाला आशा असल्याचंही पाटील म्हणाले.

(वाचा-Cyclone Tauktae: राज्यावर चक्रीवादळाचं संकट मात्र कोकणात NDRFची एकही टीम नाही)

कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. देशभरातील इतर शेतकरी देखील मोठ्या संख्येने केंद्र सरकारविरोधात आवाज उचलतील अशी आम्हाला आशा आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितलं.

पाटील यांनी वाढलेल्या खतांच्या किमतींवरून सरकारवर टीका केली. 10.26.26 ची किंमती 600 रुपयांनी वाढली आहे. डिएपीची किंमत जवळपास 715 रुपयांनी वाढली आहे. जो डिएपी 1185 रुपयांना होतं, तो आता 1900 रुपयांना मिळणार आहे. 10.26.26 चं पन्नास किलोचं पोतं 1175 रुपयांचं होतं ते आता 1775 रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशच्याही किमती वाढविल्या आहेत. त्यामुळं शेतकऱ्यावर मोठा बोजा येणार आहे. ऐन हंगामाध्ये यामुळं शेतकऱ्यासमोर अडचणी निर्माण होणार असल्यानं सरकारनं तातडीनं दरवाढ मागं घ्यावी असं पाटील म्हणाले आहेत.

First published:

Tags: Farmer, Jayant patil, NCP