मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Cyclone Tauktae: चक्रीवादळाच्या संकटाचं सरकारला गांभीर्य नाही का? कोकणात NDRFची एकही टीम नाही

Cyclone Tauktae: चक्रीवादळाच्या संकटाचं सरकारला गांभीर्य नाही का? कोकणात NDRFची एकही टीम नाही

तौत्के चक्रीवादळाने कोकणाकडे वाटचाल करण्यास सुरूवात केली आहे या काळात वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे

तौत्के चक्रीवादळाने कोकणाकडे वाटचाल करण्यास सुरूवात केली आहे या काळात वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे

तौत्के चक्रीवादळाने कोकणाकडे वाटचाल करण्यास सुरूवात केली आहे या काळात वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे

सिंधुदुर्ग, 16 मे: तौत्के चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) केरळ, गोव्यात थैमान घातल्यानंतर आता महाराष्ट्राच्या (Maharashtra) किनारपट्टी भागात येण्यास सुरूवात केली आहे. तसेच येत्या काळात वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे पण असे असताना सुद्दा सरकारला याचं गांभीर्य नाहीये का? असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यांत एनडीआरएफची एकही टीम (NDRF Team) तैनात करण्यात आलेली नाहीये.

सरकारला गांभीर्य नाही का?

चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याचं पहायला मिळत आहे. तसेच पाऊसही सुरू आहे. या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तळकोकणात मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली आहे. यामुळे रस्ते बंद झाले आहेत अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटला आहे.

वाचा: Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळाचा फटका लसीकरणाला; मुंबईत उद्या सुद्धा लसीकरण बंद

वादळाची तीव्रता लक्षात घेता गोवा आणि गुजरातमध्ये यापूर्वीच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक म्हणजेच एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एनडीआरएफची एकही टीम तैनात करण्यात आलेली नाहीये. सरकारला इतक्या तिव्र वादळाची पूर्वकल्पना असतानाही का दलाला पाचारण करण्यात आलं नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या संदर्भात एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांसोबत आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी म्हटलं, "आम्ही अलर्ट आहोत आणि राज्य सरकारच्या आदेशाच्या प्रतिक्षेत आहोत." पण प्रत्यक्षात इतक्या गंभीर चक्रीवादळाच्या परिस्थितीत एनडीआरएफने घटनास्थळावर असणे आवश्यक आहे. एनडीआरएफच्या टीम आत्ता जरी कोकणाकडे रवाना करण्याचं ठरवलं तरी त्यांना घटनास्थळावर पोहोचण्यास कमीत कमी पाच ते सहा तास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने यापूर्वीच एनडीआरएफला कोकणात पाचारण का केले नाही हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

First published:

Tags: Cyclone, Maharashtra, Sindhudurg