मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कोरोनाबरोबरच चक्रीवादळाशीही संघर्ष; गोव्यात कोविड सेंटरमध्ये घुसलं पावसाचं पाणी, प्रशासनाची धावपळ

कोरोनाबरोबरच चक्रीवादळाशीही संघर्ष; गोव्यात कोविड सेंटरमध्ये घुसलं पावसाचं पाणी, प्रशासनाची धावपळ

Tauktae cyclone hits goa coast ोव्याच्या बांबोलिम भागामध्ये असलेल्या कोविड सेंटरमध्ये पावसाचं पाणी घुसल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर काही वेळातच प्रशासनाचं पथक याठिकाणी दाखल झालं.

  • Published by:  News18 Desk

पणजी, 16 मे : कोरोनाच्या संकटाचा (Coronavirus) सामना करत असतानाच देशातील काही राज्यांवर चक्रीवादळाचं (Cyclone) संकटही निर्माण झालं आहे. आज सकाळी तौक्ते चक्रीवादळ (Tauktae Cyclone) हे गोव्याच्या (Goa Coast) किनारपट्टीवर धडकल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं गोव्यात काही भागांमध्ये जोरदार वादळी (Heavy Rain) वाऱ्यासह पाऊस पडला. त्यामुळं अनेक ठिकाणी नुकसान झालं. काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडली. काही ठिकाणी कोरोनाशी संघर्ष करणाऱ्या रुग्णांनाही याचा त्रास झाल्याचं पाहायला मिळालं.

(वाचा-बापाचा खांदाच झाला लेकीची तिरडी; कोरोना अजून किती अंत पाहणार? भयावह VIDEO)

तौक्ते चक्रीवादळामुळं गोव्यात जोरदार वादळी वारं पाहायला मिळालं. तुफान पावसाचा फटकाही गोव्याला बसल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार असलेल्या कोविड सेंटरलाही याचा फटका बसला. गोव्याच्या बांबोलिम भागामध्ये असलेल्या कोविड सेंटरमध्ये पावसाचं पाणी घुसल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर काही वेळातच प्रशासनाचं पथक याठिकाणी दाखल झालं. त्यांनी त्वरित याठिकाणी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याठिकाणी मोठं काही नुकसान मात्र झालं नाही.

गोव्याच्या किनाऱ्यावर तौक्ते चक्रीवादळ धडकल्यानंतर पणजीमध्ये त्याचा चांगलाच तडाखा बसल्याचं पाहायला मिळालं. पणजी आणि गोव्यातील इतर अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यामुळं झाडं उन्मळून पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. प्रशासन त्यामुळं निर्माण झालेले अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन त्वरित मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं आहे. आपत्कालीन स्थितीसाठी पथकं तयार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

(वाचा-Cyclone Tauktae: चक्रीवादळानं दिशा बदलली; मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता)

तौक्ते चक्रीवादळ आता हळूहळू उग्र रुप धारण करत त्यानं आपली दिशा बदलली आहे. आता हे वादळ मुंबईला भेदून गुजरातच्या दिशेनं आगेकूच करणार आहे. सध्या हे वादळ कोकण किनारपट्टीला धडकलं असून मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि उर्वरित कोकणातील नागरिकांसाठी धोका वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर आज मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्लाही हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

First published:

Tags: Covid centre, Cyclone, Goa, Rain