मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नाथाभाऊ निघाले मुंबईला... पत्रकारानं विचारलं असता म्हणाले 'येता का लग्नाला?'

नाथाभाऊ निघाले मुंबईला... पत्रकारानं विचारलं असता म्हणाले 'येता का लग्नाला?'

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या मागील आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चौकशीचा ससेमिरा कायम आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या मागील आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चौकशीचा ससेमिरा कायम आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या मागील आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चौकशीचा ससेमिरा कायम आहे.

जळगाव, 27 डिसेंबर: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे  (NCP Eknath khadse) यांच्या मागे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चौकशीचा ससेमिरा कायम आहे. एकनाथ खडसे यांना ED ने नोटीस बजावली आहे. पुण्यातील भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून येत्या 30 डिसेंबर रोजी त्यांना ED च्या कार्यालयात हजर राहावं लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर एकनाथ खडेस शनिवारी मुंबईला रवाना झाल्याचं समजतं. याबाबत एकनाथ खडसे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना विचारलं असता 'लग्नाला जातोय येता का? असा प्रतिसवालही त्यांनी केला.

हेही वाचा...संजय राऊत यांच्यावर देशद्रोह गुन्हा दाखल करावा, भाजप नेत्याची रोखठोक मागणी

जळगाव येथून एकनाथ खडसे मुंबईकडे निघणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. जळगाव शहरातील एक विवाह सोहळा आटोपून ते थेट मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

याचं भूखंडावरून व्हावं लागलं होतं पायउतार...

भोसरी इथं भूखंड खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना महसूल मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर चार वर्ष खडसे यांना मंत्रिपदापासून दूर राहावे लागले. याच प्रकरणी आता खडसे यांना ED नं नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुणे आणि नाशिक येथील अॅन्टिकप्शन ब्युरोकडून पाच वर्षांत चौकशी करण्यात आली होती. तसंच झोटिंग समिती आणि आयकर विभागाने देखील चौकशी केली होती. आता या प्रकरणाची ईडी चौकशी करणार आहे.

दरम्यान, भोसरी भूखंड प्रकरणी याआधीही चार वेळा आपली चौकशी झाली आहे. आता याच प्रकरणी ED पाचव्यांदा चौकशी करणार आहे. ED ला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं खडसेंनी सांगितलं. याआधीही आपण सर्व तपास यंत्रणांना आणि चौकशी आयोगांना वेळोवेळी सहकार्य केल्याचं ते म्हणाले.

भाजपातून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्यामागेही आता ED च्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. ED च्या नोटिशीनंतर एकनाथ खडसेंची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा...पार्थ पवार पंढरपुरातून आमदरकीची निवडणूक लढवणार का? रोहित पवार म्हणाले...

ईडीची चौकशी लावली तर मी सीडी लावेन...

एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज होते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आपली ED कडून चौकशी केली जाऊ शकते, असा अंदाज देखील खडसेंनी होता. 'त्यांनी ईडीची चौकशी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी भाजपला उद्देशून दिला होता. त्यामुळे आता खरंच एकनाथ खडसे सीडी लावतात का? आणि या सीडीतून कोणाचा भांडाफोड करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: