Home /News /maharashtra /

एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी तातडीनं मुंबईकडे रवाना

एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी तातडीनं मुंबईकडे रवाना

मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये...

भुसावळ, 19 नोव्हेंबर: जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली होती. आता माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ते उपचारासाठी मुंबईला (Mumbai) रवाना होत असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली. माझ्या सानिध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी. तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये, असं आवाहनही एकनाथ खडसे यांनी केलं आहे. हेही वाचा...भाजप खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली, हे कारण आलं समोर भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीच्या गोटात सामील झालेले एकनाथ खडसे सध्या अ‌ॅक्शन मोडमध्ये आहेत. जळगाव जिल्ह्यातील नेते तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. त्या भेटीतूनच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीचं एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. रोहिणी खडसे यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली होती. प्रकृती उत्तम असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती खुद्द रोहिणी खडसे यांनी दिली होती. रोहिणी खडसे यांनी देखील भाजपला सोडचिठ्ठी देऊन वडील एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे यामुळे उत्तर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आहेत. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातही त्या सक्रिय आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्या निवडणूक रिंगणात होत्या. मात्र, शिवसेनेच्या उमेदवाराकडून त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता. एकनाथ खडसे यांच्यासोबत अलीकडंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार यांचा पहिलाच खान्देश दौरा रद्द एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच खान्देश दौऱ्यावर जाणार होते. मात्र सोमवारी हा दौरा अचानक रद्द करण्यात आला. पवारांचा खान्देशमधील हा दौरा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे.एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. हेही वाचा...कराची स्वीट्ससाठी राऊत मनसेविरोधात मैदानात, म्हणाले, 'नाव बदलाची मागणी निरर्थक' 15 नोव्हेंबर रोजी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना जळगावमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याने एकनाथ खडसे यांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळेच शरद पवारांना उत्तर महाराष्ट्राचा दौरा काही दिवसांसाठी रद्द करावा लागला.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Eknath khadse, Jalgaon, Maharashtra, Symptoms of coronavirus

पुढील बातम्या