कराची बेकरी आणि कराची स्वीट्स (Karachi Sweets)60 वर्षापासून मुंबईसह देशात आहेत. त्यांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून उभा केलेला हा व्यवसाय आहे
मुंबई, 19 नोव्हेंबर : मुंबईमध्ये (Mumbai) कराची स्वीट्सचे (karachi sweets)नाव बदलण्यात यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) न्यायालयातील लढाई लढण्याचा इशारा दिला आहे. तर 'कराची बेकरी आणि कराची स्वीटसचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही, कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोध दर्शवला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून मनसेच्या मागणीला जाहीरपणे विरोध केला आहे. तसंच कराची स्वीट्सच्या नावावरून मनसेची कानउघडणी सुद्धा केली आहे.
कराची बेकरी आणि कराची स्वीटस 60 वर्षापासून मुंबई सह देशात आहेत. तयांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून ऊभा केलेला हा व्यवसाय आहे.कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे.
'कराची बेकरी आणि कराची स्वीट्स 60 वर्षापासून मुंबईसह देशात आहेत. त्यांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून उभा केलेला हा व्यवसाय आहे' असं सांगत राऊत यांनी मनसेची कानउघडणी केली आहे.
तसंच, 'कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे' असं सांगत 'ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही' असंही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईत कराची स्वीट्स नावाने दुकानं सुरू असल्याचे निर्दशनास आल्यानंतर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'देशाचा पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानची राजधानी कराची या नावाने बहुचर्चित 'कराची स्वीट्स' या नावाचा आधार घेऊन मिठाईचे दुकान सुरू केले आहे. त्यामुळे भारतीयांच्या राष्ट्रवादाला ठेचू पोहोचून हा व्यवसाय केला जात आहे', असा आक्षेप मनसेचे नेते हाजी सैफ शेख यांनी घेतला आहे.
या प्रकाराबद्दल हाजी शेख यांनी कराची व्यवस्थापनाला एक पत्र लिहून तात्काळ नाव हटवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर एक कायदेशीर नोटीस सुद्धा हैदराबाद येथील कराची स्वीट्स व्यवस्थापकांना देण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये आजपर्यंत अनेकवेळा हिंसाचार झाला आहे. दहशतवाद्याची मोठा आधार म्हणून पाकिस्तानने तिथल्या हिंसाचाराला चिथावणी दिली आणि पाठिंबा दर्शवला. पाकिस्तान आपल्या सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवर गोळीबार केला आहे, आपले जवान यात शहीद झाले आहे, त्यामुळे अशा देशाच्या राजधानी असलेल्या कराची नावाने महाराष्ट्रात व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही मनसेनं दिला आहे.