मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजप खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली, हे कारण आलं समोर

भाजप खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली, हे कारण आलं समोर

आमदार चंद्रकांत पाटील हे रक्षा खडसे यांचे सासरे आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात.

आमदार चंद्रकांत पाटील हे रक्षा खडसे यांचे सासरे आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात.

आमदार चंद्रकांत पाटील हे रक्षा खडसे यांचे सासरे आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात.

भुसावळ, 18 नोव्हेंबर: भाजपच्या खासदार रक्षा खडसे (BJP MP Raksha Khadse) आणि मुक्ताईनगरचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील (Shiv Sena MLA Chandrakant Patil) यांच्यात एका कार्यक्रमात चांगलीच बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. बोदवड (जि. जळगाव) (Bodwad, jalgaon)येथे सीसीआय केंद्राचे उद्घाटन व कापूस खरेदीचा शुभारंभ कार्यक्रमावरून खासदार रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या जुंपल्याची माहिती मिळाली. आमदार चंद्रकांत पाटील हे रक्षा खडसे यांचे सासरे आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. हेही वाचा...मराठा आरक्षणासाठी सरकारचं आणखी एक पाऊल पुढे, घटनापीठासाठी चौथा अर्ज झालं असं की, आमदार चंद्रकांत पाटील यांना सीसीआय केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास येण्यास उशीर झाला. त्यामुळे ते येण्यासाधीच खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आमदार चंद्रकांत पाटील यांना त्याचा राग आहे. उद्घाटन कार्यक्रमास थोडं थांबता आलं असतं, असं म्हणत आमदार पाटील यांनी संताप व्यक्त केला. कार्यक्रमाची सकाळी 10 वाजेची वेळ होती. मात्र, वाट पाहूनच मग कार्यक्रम घेण्यात आल्याचं खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा खासदार रक्षा खडसेंवर पलटवार केला. मला आधी सांगितलं असतं तुम्हीच घेतला असता कार्यक्रम, असं सांगत आमदार चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावला. दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांचा आमदार चंद्रकांत पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव केला होता. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानं चंद्रकांत पाटील नाराज... भाजपला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात आनंद सुरुय तर शिवसेनेसाठी हा निर्णय भविष्यात संघर्षाचा ठरु शकेल अशी चिन्ह दिसत आहेत. खडसेंच्या प्रवेशावेळी विश्वासात न घेतल्याने मुक्ताईनगरचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील नाराज झाले आहेत. मुक्ताईनगर येथील निवडणूक लढून ते विजयी झाले होते. मी एकनाथ खडसे यांच्या मुलीला हरवून विजयी झालो आहे आणि महाविकास आघाडीत असतानाही खडसे यांना प्रवेश देताना मला विचारात घेतले नाही त्यामुळं नाराजी असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. खडसे भाजपात असताना त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला आहे. आमच्या तोंडी फेस आणलाय. आमच्यावर अन्याय केला आणि आता तेच पक्षाकडून अन्याय झाल्याची भाषा करतायत असेही पाटील म्हणाले होते. आता जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगले चालले आहे. ते आता खडसे आल्यामुळं व्यवस्थित चालेल असं वाटत नाही असेही ते म्हणाले होते. हेही वाचा...कुटुंबावर काळाचा घाला; आजी आणि नातीनं जागीच गमावला जीव, आईची मृत्यूशी झुंज जिल्ह्यातील शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर त्यांनी खोटे गुन्हे नोंदवले आहेत. त्यामुळे कटुता लगेच संपेल असं वाटत नाही. त्यांची काम करण्याची पद्धतच वेगळी असल्याचे पाटील म्हणाले होते.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Chandrakant patil, Eknath khadse, Jalgaon, Raksha khadse

पुढील बातम्या