जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अंगभर टॅटू काढणाऱ्यांनो जरा जपून; अजितदादांचा हा सल्ला ऐकलात का?

अंगभर टॅटू काढणाऱ्यांनो जरा जपून; अजितदादांचा हा सल्ला ऐकलात का?

अजित पवार

अजित पवार

आज बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलत होते.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 17 जून, जितेंद्र जाधव : आज बारामतीमध्ये एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया संस्थेच्या वतीनं हॅप्पी स्ट्री्टस या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज पहाटे साडेपाच वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार देखील उपस्थित होते. बारामतीकरांनी या कार्यक्रमाला गर्दी केली. विविध व्यवसायिकांनी या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला होता. या उपक्रमात टॅटू काढणारे व्यवसायिक देखील सहभागी झाले हेते. नेमकं काय म्हणाले अजित पवार?  यावेळी बोलताना अजित पवार यांनी अंगभर टॅटू काढणाऱ्यांचा खास आपल्या शैलीत समाचार घेतला आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की,  टॅटू काढणे गैर नाही परंतु काही लोक अंगभर टॅटू काढतात. आपल्या आई,वडिलांनी आपल्याला जन्म दिला,  आपल्याला एवढं  चांगल शरीर मिळालं. उगच त्याचं वाटोळं का करायचं?

Breaking news : ठाकरे गटाला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंचा आणखी एक शिलेदार शिंदे गटात, आज पक्षप्रवेश

काहीही टॅटू काढत बसू नका, छोटा टॅटू काढायचा असेल तर काढा, पण काही जण पूर्ण शरीरभर टॅटू काढतात. आपल्या हातावर मित्रांचे नाव किंवा मौत्रिनेचे नाव काढायचं असेल तर ठिक आहे. एका ठिकाणी मी एका मुलीच्या हातावर तिच्या आईचं नाव काढलं होते, ते पण ठिक आहे. परंतु टॅटूचा अतिवापर अयोग्य असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात