

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ने धमाकेदार शतक केलं. विराटच्या अनुपस्थितीमध्ये रहाणेने कॅप्टन्स नॉक खेळत भारताला मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं. रहाणेचं टेस्ट क्रिकेटमधलं हे 12वं शतक आहे. क्रिकेटचा सगळ्यात कठीण फॉरमॅट म्हणून ओळख असणाऱ्या टेस्ट क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी रहाणेला आणि त्याच्या पालकांना संघर्षही तितकाच करावा लागला.


रहाणेला क्रिकेट कॅम्पपर्यंत पोहोचवण्यासाठी अजिंक्यची आई रोज त्याला घेऊन 2 किमी चालत जायची. अजिंक्य दुसरीमध्ये असताना शाळा संपल्यानंतर त्याची आई आणि लहान भाऊ सरावासाठी न्यायचे. अजिंक्य जेव्हा सराव करायचा तेव्हा त्याची आई आणि छोटा भाऊ तिकडेच थांबायचे आणि त्याचा सराव संपल्यानंतर घरी परतायचे. (Photo-BCCI)


आर्थिक चणचण आणि चांगल्या करियरसाठी वडिलांनी अजिंक्यला क्रिकेटपासून लांब करण्याचं ठरवलं होतं, पण अजिंक्यची आई सुजाता या धीराने उभ्या राहिल्या, कारण मुलाच्या क्षमतेवर त्यांना पूर्ण विश्वास होता. अजिंक्यनेही त्याच्या आईचा हा विश्वास सार्थ ठरवला आणि आई-वडिलांसोबतच देशाचं नावंही मोठं केलंन.


डोंबिवलीमध्ये अजिंक्य रहाणेने त्याचं शिक्षण पूर्ण केलं, सुरुवातीला तिकडेच तो क्रिकेटचा सरावही करायचा. यानंतर अजिंक्य प्रविण आमरेंच्या संपर्कात आला आणि मग त्याने मागे वळून पाहिलं नाही.


2011 साली इराणी ट्रॉफीच्या मॅचवेली रहाणेने 152 रनची खेळी केली होती. यादरम्यान शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे रहाणेला टीम इंडियामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.


क्रिकेटशिवाय अजिंक्य रहाणे कराट्यांमध्येही रस आहे. अजिंक्यने कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे.