झोपेत असताना मंदिरात लागली आग, बाहेर पळाले पण गेटवरच मृत्यूने गाठले

झोपेत असताना मंदिरात लागली आग, बाहेर पळाले पण गेटवरच मृत्यूने गाठले

चारकोप येथील साई सचिदानंद मंदिरामध्ये शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली होती.

  • Share this:

मुंबई, 27 डिसेंबर : मुंबईतील (Mumbai) कांदिवली येथील चारकोप (Charkop) परिसरात एका मंदिरात भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत झोपते असलेल्या 2 तरुणाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तर 1 तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

चारकोप येथील साई सचिदानंद मंदिरामध्ये शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली होती. त्यावेळी मंदिरामध्ये तीन जण झोपलेले होते. काही कळायच्या आता आगीने रौद्ररुपधारण केले होते. त्यामुळे झोपत असलेल्या तीन तरुणांना बाहेर पळता आले नाही, त्यामुळे जागेवरच दोन तरुणांचा होरपळून मृत्यू झाला.

थलैवा रजनीकांतच्या चाहत्यांसाठी Good News; रुग्णालयातून लवकरच मिळणार डिस्चार्ज

या दुर्घटनेत मंदिराचे संस्थापक युवराज पवार, सुभाष खोडे आणि मोनू गुप्ता या तिघांचा मृत्यू झाला. तिघेही जण नेहमीप्रमाणे मंदिरात झोपले होते. चोरीच्या धाकाने रोजच्या सवयीप्रमाणे तिघांनी मंदिराचे दार बंद करून घेत होते.

शनिवारी पहाटे 3 वाजता मंदिरात आग लागली. पण, काही काळ तिघांना आगीची जाणीव झाली नाही. मात्र, आगीची तीव्रता वाढत केल्यानंतर तिघांना उष्णता जाणवायला लागली. त्यामुळे तिघांनी मंदिराबाहेर जीव वाचवण्यासाठी पळ काढला. पण, गेट बंद करण्यात आलेले होते. त्यामुळे ताळे उघण्यासाठी तिघांनी धडपड केली. पण, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. मंदिराच्या गेटवरच युवराज पवार आणि सुभास खोडे यांचा जागेवर मृत्यू झाला. तर मोनू गुप्ता हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे.

21 वर्षांनी भारतीय क्रिकेटमध्ये आला हा दिवस, सचिननंतर रहाणेचा रेकॉर्ड

मंदिरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळी मंदिराला आग लागल्याची बाब निदर्शनास आली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून अधिक तपास करीत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मंदिराची देखभाल करणारे युवराज पवार आणि सुभास खोडे दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Published by: sachin Salve
First published: December 27, 2020, 1:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या