उस्मानाबाद, 10 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. पण, याच मुदयावर पत्रकार परिषद घेणे चित्रा वाघ यांना अडचणीचे ठरणार आहे. वाघ यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. यामुळे चित्रा वाघ अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठवाड्यात शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता चालू असून उस्मानाबाद जिल्ह्यालाही ती आचारसंहिता लागू आहे. असं असताना देखील चित्रा वाघ यांनी तुळजाभवानी मंदिरात भाजपचे पदाधिकारी यांच्या समवेत पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्या वतीने केला आहे. (‘विरोध केला नाही तर चौका चौकात…’; चित्रा वाघांचा पुन्हा उर्फीवर निशाणा) या प्रकरणी तक्रार विभागीय आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी सुनील केंद्रेकर यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली असून तर निवडणूक निर्णय अधिकारी यावर काय निर्णय घेतात हे पाहणे गरजेचे आहे. चित्रा वाघ या सोमवारी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेत केली. आता याच दर्शनामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (संजय राऊत यांचा जामीन कायम की पुन्हा जेलवारी? ‘या’ तारखेला होणार हायकोर्टात सुनावणी) दरम्यान, मेरा डीपी ढासू, चित्रा मेरी सासू असं ट्वीट करून उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं होतं. मात्र, ‘उर्फीच्या ट्विटवरती प्रतिक्रिया देण्यासारखे काहीच नाही पांचट गोष्टीवर आपण काय बोलावं कोणी काहीही बोलावं नावाची तोडमोड करावी कधी आणखी काही लिहावे त्याच्याने माझ्या लढाईमध्ये काही फरक पडत नाही. अभी तो पुरा सुधारणा बाकी है नाही सुधरे तो हमारे पास बडी बडी गोलिया बाकी है. ह्या गोळ्या बंदुकीच्या गोळ्या नसून काल कोणीतरी सांगितले कपड्याची अलर्जी त्यांना आहे. त्या अलार्जी दूर करण्याच्या गोळ्या आहेत. ह्याचं गोळ्या दिल्या जातील’ असा पलटवार वाघ यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.