जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'विरोध केला नाही तर चौका चौकात...'; चित्रा वाघांचा पुन्हा उर्फीवर निशाणा

'विरोध केला नाही तर चौका चौकात...'; चित्रा वाघांचा पुन्हा उर्फीवर निशाणा

चित्रा वाघ

चित्रा वाघ

उस्मानाबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर पुन्हा टीका केली आहे. त्याचप्रमाणे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधलाय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 जानेवारी : अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरणात आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात दाखल केलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्रातील महिला राजकारणी आमने - सामने आल्या आहेत. उर्फीचं चित्रा वाघांवर ट्विट वॉर सुरू आहे. तर चित्रा वाघ देखील पत्रकार परिषद घेत उर्फीवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नसल्याचं पाहायला मिळत आहे. उस्मानाबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर पुन्हा टीका केली आहे. ‘विरोध केला नाही तर चौका चौकात नागडे नाच पाहायला मिळतील’, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी उस्मनाबाद येथून पत्रकार परिषद घेतली. तिथे बोलताना त्यांनी उर्फीवर निशाणा साधला. ‘महाराष्ट्राच्या मातीतील एका महिलेनं मला उर्फीचे इन्स्टाग्रामचे रिल्स पाठवले. मी ते पाहून हैराण झाले. माझं डोकंच फिरलं.  असे नंगे नाच मुंबईत चालतात. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली नागडे नाच सुरू आहेत.  आम्ही विरोध केला नाही तर मुंबईतल्या गल्ल्या गल्ल्यात असे नागडे नाच सुरू होतील’, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं. हेही वाचा - Urfi Javed: ‘चित्रा मेरी सासू’; उर्फी जावेदनं वाघांना पुन्हा डिवचलं, ट्विट चर्चेत उर्फी जावेद प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काही दिवसांआधी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याची माहिती दिली. रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्यावर उत्तर देण्यासाठी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या,‘आम्हाला वेळ वाया घालवायला वेळ नाही’ असं जबरदस्त उत्तर दिलं आहे त्या उत्तराला उत्तर द्यायला आम्ही आलो आहोत. एका पोस्टर समाजात चुकीचा मेसेज जातो असं सांगून नोटीस पाठवणारे नंगा नाच करणाऱ्यांसाठी वेळ नाही म्हणतात. आम्ही  हे चालू देणार नाही’.

News18लोकमत
News18लोकमत

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या,  ‘मला नोटीस पाठवल्याचं दुख नाही. आयोगावर आम्ही काम करून आलो आहोत त्या आत्ता आल्या आहेत. आक्षेप आयोगाला नाही चेअर पर्सच्या कामावर आहे. एक अध्यक्ष म्हणजे आयोग नाही. आयोग म्हणजे अध्यक्ष असतात त्यांच्याबरोबर सदस्य असताता त्यांच्यावर डिजी असतात. तुमचा अभ्यास कच्चा आहे असं त्या मला सांगतात. मी म्हणते तुम्ही तुमचा पेपर मोठ्या सुप्रिया सुळे यांच्याकडे बसून सोडवा. आम्ही आमचं काम करतोय तुम्ही तुमचं काम करा.  तुम्ही एक प्रश्न विचारला तर त्याला 40 जोरदार प्रश्न येणार’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात