जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / NCP : अजित पवार गट भेटल्यानंतर काय होती शरद पवारांची रिएक्शन? बैठकीची Inside Story

NCP : अजित पवार गट भेटल्यानंतर काय होती शरद पवारांची रिएक्शन? बैठकीची Inside Story

राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला

राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार यांचा गट शरद पवार यांना भेटायला गेला होता. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

विनोद राठोड, प्रतिनिधी मुंबई, 16 जुलै : राष्ट्रवादी काँग्रसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार यांचा गट शरद पवार यांना भेटायला गेला होता. यामध्ये अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे हे नेते उपस्थित होते. या भेटीमध्ये नेमकं काय झालं, तसंच शरद पवारांची प्रतिक्रिया काय होती? याबद्दलची माहिती प्रफुल पटेल आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. काय म्हणाले प्रफुल पटेल? शरद पवारांची भेट घेतल्यानंतर प्रफुल पटेल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ‘शरद पवार यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत. सर्वांनी नमस्कार करून आशिर्वाद मागितला. शरद पवारांना विनंती केली की राष्ट्रवादी एकसंघ राहू शकतो, असा प्रयत्न करावा. शरद पवारांकडून कुठलंही उत्तर दिलं गेलं नाही. शरद पवारांना न कळवता आम्ही भेटायला आलो आहोत,’ असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं. सत्तेत एकत्र मात्र स्थानिक पातळीवर धुसपूस; बीडमध्ये भाजप-राष्ट्रवादीच्या आमदारात जुंपली जयंत पाटील यांची प्रतिक्रिया ‘मी अंबादास दानवे यांच्या बैठकीत होतो. अचानक मला फोन आला, त्यांनी शरद पवारांकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी जे काही केलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. ज्या काही घटना झाल्या त्यामध्ये मार्ग काढावा, अशी विनंती त्यांनी केली, पण शरद पवार काहीही बोलले नाहीत. अचानकपणे भेट घेण्यामागे काय उद्देश आहे, हे माहिती नाही,’ असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात