Home /News /news /

तरुणीच्या अंत्यदर्शनाला जाऊन 45 जणांनी धोक्यात घातला जीव, नंतर झालं असं..

तरुणीच्या अंत्यदर्शनाला जाऊन 45 जणांनी धोक्यात घातला जीव, नंतर झालं असं..

मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यदर्शनासोबत त्यांच्या कुटुंबीयांच सांत्वन प्रत्येकच ठिकाणी केलं जातं. पण...

    वर्धा, 8 मे: मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यदर्शनासोबत त्यांच्या कुटुंबीयांच सांत्वन प्रत्येकच ठिकाणी केलं जातं. पण आता कोरोना विषाणूनं त्याचा अर्थच बदलून टाकला आहे. कोरोनाबाधित जिल्ह्यातून आलेल्या तरुणीच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला गेल्यामुळे 45 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. वर्धा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. वर्ध्याच्या दहेगाव (स्टेशन) इथल्या एका तरुणीला दीर्घ आजारामुळे औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथं देखभालीसाठी परिवारातील सदस्यही होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. परवानगी घेऊन तिचं पार्थिव गावात अंत्यसंस्कारासाठी आणलं. त्यापूर्वी सोबत असलेल्याची आरोग्य तपासणीही केल्या गेली. हेही वाचा...अखेरचा ठरला प्रवास..पायी घरी निघालेल्या 16 मजुरांना वाटेत मृत्यूनं असं गाठलं! ग्रामपंचायत आणि प्रशासनानं त्यांना पार्थिव सरळ स्मशानभूमीत नेण्यास सांगून तशी तयारीही केली. पण नातेवाईकांनी पार्थिव घरी नेलं. मनाईनंतरही इथं जवळपासचे अंत्यदर्शनाला आले होते. त्यांची यादीच आरोग्य विभागान तयार केली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर दहेगाव (स्टेशन) आणि दहेगाव (गावंडे) अशा दोन गाव मिळून तब्बल 45 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. हेही वाचा...धोकादायक इशारा! मे महिन्यात आणखी वाढू शकतो कोरोनाचा कहर तरुणीचा मृत्यू ज्या रुग्णालयात झाला ते औरंगाबाद जिल्हा कोरोनाबाधित आहे. तरुणीचा मृत्यूनंतरचा प्रवासही कोरोनाबाधित जिल्ह्यातून झाला. त्यामुळे पार्थिव आणि त्यांच्यासोबत आलेल्यांशी संपर्कात आलेल्यांना आरोग्य विभागाकडून होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. धोकादायक कोरोनामुळे सर्वच गोष्टीवर मर्यादा आणि बंधन आली आहेत. त्यामुळे बंधन पाळणं आपल्याच आरोग्याला चांगलं आहे. आता भान विसरलेल्यांना प्रशासनानं होम क्वारंटाईन केलं आहे. पण धोके लक्षात घेता प्रत्येकानं जबाबदारीनं वागण्याची गरज आहे. त्यामुळे काळजी घेण स्वत:साठीही आणि इतरांनाही सुरक्षित ठरु शकतं, असं आवाहन करण्यात आलं आहे. संपादन- संदीप पारोळेकर
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या