मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शरद पवारांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र; उद्धव ठाकरेंकडे केली 'ही' मागणी

शरद पवारांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र; उद्धव ठाकरेंकडे केली 'ही' मागणी

Sharad Pawar in Action again राज्य सरकारला पत्र लिहून शरद पवारांना काही वर्गातील घटकांना मदत करण्याची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी पवार सूचना करत असलेला क्षण फेसबूक लाईव्ह केला.

    मुंबई, 07 मे : राष्ट्रवादीचे प्रमुख (NCP Chief) आणि राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रकृतीविषयी (Sharad Pawar Health) गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण शरद पवार यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केल्याचे संकेत मिळाले आहे. पवारांनी नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) पत्र लिहून काही सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी फेसबूक लाईव्ह करत पवारांची प्रकृती उत्तम असल्याचे संकेत दिलेत. शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी पित्ताशयासंदर्भातील शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली. प्रकृतीच्या या कारणामुळं शरद पवार गेल्या काही दिवसांत सक्रिय राजकारणापासून दूर होते. पण आता त्यांची प्रकृती सुधारत असून त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केल्याचे संकेत मिळाले आहेत. पवारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला काही सूचना केल्या आहेत. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या या संकटाच्या स्थितीमध्ये काही घटकांना मदतीची गरज आहे. त्यांना सरकारनं मदत करण्याची मागणी पवार यांनी या पत्राद्वारे केली आहे. या पत्राबाबत सूचना करातानाचं फेसबूक लाईव्ह सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. यामध्ये शरद पवार कशा प्रकारे मदत करावी, केंद्राकडून कोणत्या योजनांद्वारे मदत देता येईल, असा सूचना करताना दिसत आहेत. शरद पवारांनी प्रामुख्यानं शेतकरी आणि लहान व्यावसायिकांना मदत करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. वाचा: मोठी बातमी! महाराष्ट्रात येणारे ऑक्सिजन टँकर्स गुजरातला पळवण्याचा कट उघड या फेसबूक लाईव्ह मध्ये शरद पवार त्यांच्या भेटींच्या बद्दलही बोलताना दिसत आहेत. त्यात पवारांच्या अपॉइंटमेंटचा उल्लेख सुप्रिया सुळेंनी केला. म्हणजेच शरद पवार यांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात केल्याचे संकेत याद्वारे मिळाले आहेत. शरद पवारांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केल्यानंतर आता मराठा आरक्षण किंवा इतर मुद्द्यांवर कशाप्रकारे त्यांची मतं समोर येणार हेही आता पाहता येणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Sharad pawar, Uddhav thackeray

    पुढील बातम्या